Mumbai Unlock updates : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत वाढत असलेल्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. 7 जूनपासून त्यामध्ये शिथिलता आणण्यात आली. यावेळी अनलॉकसाठी 5 टप्पे ठरविण्यात आले आहेत. आता पुणे, नाशिकसह काही ठिकाणी एक आठवड्यानंतर लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता आणली जाणार आहे. सध्या मुंबई तिसऱ्या टप्प्यात असून 7 जूननंतर पुढील आठवड्यात मुंबईकरांना अजून दिलासा मिळतोय का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुंबईतील लोकल सेवेबद्दल सर्वांना उत्सुकता होती, परंतु लोकल सेवा सध्या बंदच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. Mumbai Unlock updates Third Phase Restriction local trains remain Closed this week
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत वाढत असलेल्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. 7 जूनपासून त्यामध्ये शिथिलता आणण्यात आली. यावेळी अनलॉकसाठी 5 टप्पे ठरविण्यात आले आहेत. आता पुणे, नाशिकसह काही ठिकाणी एक आठवड्यानंतर लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता आणली जाणार आहे. सध्या मुंबई तिसऱ्या टप्प्यात असून 7 जूननंतर पुढील आठवड्यात मुंबईकरांना अजून दिलासा मिळतोय का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुंबईतील लोकल सेवेबद्दल सर्वांना उत्सुकता होती, परंतु लोकल सेवा सध्या बंदच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासनाने तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईची लोकसंख्येची घनता, लोकलमधून दाटीवाटीने प्रवास, तसेच मुंबईतला अतिवृष्टीचा इशारा, या सर्व बाबींमुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्यात येणाऱ्या अडचणी येणार असल्याचे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने सध्या सुरू असलेले निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात तरी मुंबईकरांसाठी लोकल सुरू होणार नाही.
सध्या मुंबईतला पॉझिटिव्हिटी रेट 4.40 टक्के एवढा आहे. तर ऑक्सिजन बेड्सचे प्रमाण 27.12 टक्के एवढे आहे. बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणार्या रुग्णांचे प्रमाण 95 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. मुंबईत काल कोरोनाचे 696 रुग्ण आढळले, 24 जणांचा मृत्यू झाला. याच काळात 658 जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या शहरात 15,819 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Mumbai Unlock updates Third Phase Restriction local trains remain Closed this week
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App