प्रतिनिधी
मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याची बातमी आहे या भेटीमध्ये मुंबईतील आणि महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चर्चा झाल्याचे समजते. तसेच या भेटीमध्ये केतकी चितळे तिच्या वादग्रस्त पोस्ट बद्दल तसेच तिच्यावर झालेल्या कारवाई बद्दल देखील चर्चा झाल्याची माहिती आयबीएन लोकमतने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. Mumbai Police Commissioner Sanjay Pandey meets Sharad Pawar
– वादग्रस्त पोस्ट
केतकी चितळे हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शरद पवारांविषयी वादग्रस्त काव्य व्हायरल केले होते. नितीन भावे या व्यक्तीने हे काव्य लिहिले आहे. मात्र, त्यानंतर केतकी चितळे हिच्याविरुद्ध महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये एफआयआर दाखल झाले. तिला गोरेगाव पोलिसांनी अटक करून काही दिवस पोलीस कोठडीत ठेवले. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. तिच्याविरुद्ध 14 ठिकाणी एफआयआर दाखल झाल्याने एका पाठोपाठ एक शहरांमधले पोलिस केतकीचा ताबा मागणार असल्याच्या बातम्या आहेत.
– केतकी न्यायालयीन कोठडीत
या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी शरद पवारांची भेट घेतली असण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. केतकी चितळे नेमकी कोण? आपण तिला ओळखत नाही, असे उत्तर शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांना दिले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपण केतकी चितळेला ओळखत नसल्याचे सांगितले होते. सध्या ती न्यायालयीन कोठडीत असून पोलीस पुढचा तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App