Cruise Ship Drug Party Case : क्रूझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खानचा जामीन फेटाळला, जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याची सूचना

Mumbai Cruise Ship Drug Party Case Aryan Khan Bail Rejected by Fort Court Today Latest News

Cruise Ship Drug Party Case :  शाहरुख खानचा मुलगा आर्यनची जामीन याचिका फेटाळण्यात आली आहे. फोर्ट कोर्टाने म्हटले की, त्यांना जामिनावर सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. आर्यनला जामिनासाठी सत्र न्यायालयात अपील करावे लागेल. आर्यनसोबत क्रूझ शिपवर ड्रग्ज पार्टी केल्याचा आरोप असलेल्या अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन याचिकाही फेटाळण्यात आल्या आहेत. Mumbai Cruise Ship Drug Party Case Aryan Khan Bail Rejected by Fort Court Today Latest News


प्रतिनिधी

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यनची जामीन याचिका फेटाळण्यात आली आहे. फोर्ट कोर्टाने म्हटले की, त्यांना जामिनावर सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. आर्यनला जामिनासाठी सत्र न्यायालयात अपील करावे लागेल. आर्यनसोबत क्रूझ शिपवर ड्रग्ज पार्टी केल्याचा आरोप असलेल्या अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन याचिकाही फेटाळण्यात आल्या आहेत.

फोर्ट न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी शुक्रवारी दुपारी 12.45 च्या सुमारास सुरू झाली, जी दुपारी 2.15 पर्यंत चालली. ब्रेकनंतर दुपारी 3 वाजता सुनावणी पुन्हा सुरू झाली. तपास यंत्रणा आणि बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर फोर्ट न्यायालयाने सायंकाळी 5 वाजता जामीन अर्ज फेटाळला.

आर्यन आर्थर रोड कारागृहात

दरम्यान, एनसीबीने आर्यनसह सर्व 6 पुरुष आरोपींना आर्थर रोड जेल आणि दोन्ही महिला आरोपींना भायखळा कारागृहात पाठवले आहे. आर्यनला क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे, परंतु कारागृहाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, त्याला 7 दिवस क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्याचा नियम आहे.

न्यायालयाने सर्व आरोपींना गुरुवारी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते, परंतु सुनावणी उशिरापर्यंत चालली आणि संध्याकाळी 6 नंतर जेलमध्ये प्रवेश नव्हता, त्यामुळे आर्यनसह 8 आरोपींना एनसीबीच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते.

आज या प्रकरणात, दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद झाले आहेत, वेगवेगळ्या प्रकरणांचा हवाला देत, जामीन अर्जावरील सुनावणी या न्यायालयात झाली पाहिजे की नाही यावर वाद-प्रतिवाद झाले. यादरम्यान आर्यनचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले की, जर वाद असेल तर न्यायाधीशांनी हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे पाठवायला हवे होते, पण दुर्दैवाने तसे झाले नाही.

मानशिंदे यांनी असा युक्तिवाद केला की, कमी प्रमाणात ड्रग्जच्या प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला, नंतर माझ्या क्लायंटकडे काहीही सापडले नाही. तसेच ते म्हणाले की, केंद्र सरकार या प्रकरणात इतकी घाई का करत आहे? त्याला उत्तर देताना एएसजी अनिल सिंह म्हणाले की, तुम्ही असे म्हणू शकत नाही.

एनसीबीला हवी होती 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

आर्यन खान आणि त्याच्यासह अटक केलेल्या 7 जणांची एनसीबी कोठडी काल संपली. एनसीबीने त्यांच्या कोठडीत 11 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मागितली होती, परंतु न्यायालयाने अपील स्वीकारले नाही आणि आर्यन खानसह आठही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली

आर्यनच्या वकिलांनी दोन जामीन अर्ज दाखल केले

आर्यनच्या वकिलांनी दाखल केलेल्या दोन याचिकांपैकी एक अंतरिम जामिनासाठी होती, जेणेकरून आर्यनला तत्काळ जामीन मिळावा आणि दुसरी नियमित जामिनासाठी म्हणजेच प्रकरणाची चौकशी होईपर्यंत तो जामिनावर राहू शकेल. एनसीबीने एनडीपीसी कायद्यांतर्गत नियमित जामिनाला आधीच विरोध केला आहे. यापूर्वी न्यायालयाने २४ तास चाललेल्या सुनावणीनंतर गुरुवारी आर्यनसह सर्व 8 आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाच्या सुनावणीपूर्वी सर्व आरोपींची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली आणि सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Mumbai Cruise Ship Drug Party Case Aryan Khan Bail Rejected by Fort Court Today Latest News

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण