मुंबई – गोवे क्रूझवरील कारवाई राष्ट्रवादीचेच षडयंत्र, सूत्रधार सुनील पाटील; मोहित भारती यांचे आरोप

प्रतिनिधी

मुंबई : मुंबई – गोवे क्रुझवरील ड्रग्सच्या पार्टीवरील कारवाई हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच षडयंत्र होते, त्यामागील प्रमुख सूत्रधार हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या जवळचा २० वर्षांपासूनचा माणूस असलेला सुनील पाटील हा आहे. किरण गोसावी, सॅम डिसुझा, प्रभाकर साईल हे सर्व जण पाटीलचीच माणसे आहेत, महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्याला बदनाम करण्यासाठी, भाजपाला बदनाम करण्यासाठी, ड्रग्सच्या धंद्याला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीने हा प्लॅन तयार केला, असा गंभीर आरोप भाजपचे नेते मोहित भारती यांनी पत्रकार परिषदेत केला. Mumbai: Action on Goa Cruise is NCP’s conspiracy, facilitator Sunil Patil; Allegations by Mohit Bharti

कोण आहे सुनील पाटील?

मनोज भारती यांच्या म्हणण्यानुसार सुनील पाटील हा २० वर्षांपासून एनसीपीच्या संपर्कात आहे. तो एनसीपीच्या मंत्र्यांच्या जवळचा आहे. २०१४ पर्यंत तो बदल्यांचे रॅकेट चालवायचा. त्यानंतर सरकार बदलले, तेव्हा सुनील पाटील गायब झाला, २०१९मध्ये सरकार बदलले आणि पाटील पुन्हा सक्रिय झाला.

क्रूझवरील पार्टीची माहिती सुनील पाटीलला होती

क्रूझवर पार्टीसाठी येणाऱ्या २७ लोकांच्या नावांची यादी पाटीलकडे होती. त्याने १ सप्टेंबर रोजी सॅम डिसुझाला फोन करून ही माहिती दिली आणि अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्याशी संपर्क करण्याची मागणी केली. त्यानंतर पाटीलचा अधिकारी बी.व्ही. सिंग यांच्याशी संपर्क झाला. २ सप्टेंबरला पाटील सॅम डिसुझाला म्हणाला, मला एनसीबीचा माणसाशी भेट करून दे.  डिसुझाने किरण गोसावीशी संपर्क करून दिला. अशा प्रकारे सुनील पाटीलला त्या ड्रग्सच्या पार्टीची इत्यंभूत माहिती आधीच कशी होती?, असा प्रश्न भारती यांनी केला. क्रूझवरील कारवाईशी भाजपचा संबंध आहे, असे चित्र निर्माण करण्यात आले. राष्ट्रीय यंत्रणेला बदनाम करण्यासाठी मंत्री कार्यरत झाले, त्यांना राज्यातील ड्रग्सच्या धंद्याला बळकटी द्यायची आहे का, असा प्रश्न भारती यांनी केला.राष्ट्रवादीचे दाऊदशी संबंध!

तसेच दाऊदच्या “म्याव म्याव” या अमली पदार्थांचा धंदा करणाऱ्या चिंकू पठाणसोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक होऊन डील झाली. त्यावेळी नवाब मलिक यांचा जावई होता. यावरून राष्ट्रवादीचे कुख्यात गुंड दाऊदसोबत काय संबंध आहेत? अमली पदार्थांच्या धंद्यातील पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरण्याचा कट एनसीपीचा होता का, असा सवाल भरती यांनी केला आहे.

Mumbai: Action on Goa Cruise is NCP’s conspiracy, facilitator Sunil Patil; Allegations by Mohit Bharti

महत्त्वाच्या बातम्या