
Mukesh Ambani : गेल्या काही दिवसांपासून गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यात सुरू असलेल्या संपत्तीच्या शर्यतीत पुन्हा एकदा रिलायन्स समूहाच्या चेअरमनने बाजी मारली आहे. शुक्रवारी अदानी समूहाच्या अध्यक्षांनी मुकेश अंबानींना मागे टाकत सर्वात श्रीमंत भारतीयाचा मुकुट घातला होता, मात्र बुधवारी सकाळी पुन्हा एकदा अंबानी शीर्षस्थानी पोहोचले. Mukesh Ambani re-emerges as richest man in Asia, overtaking Gautam Adani
वृत्तसंस्था
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यात सुरू असलेल्या संपत्तीच्या शर्यतीत पुन्हा एकदा रिलायन्स समूहाच्या चेअरमनने बाजी मारली आहे. शुक्रवारी अदानी समूहाच्या अध्यक्षांनी मुकेश अंबानींना मागे टाकत सर्वात श्रीमंत भारतीयाचा मुकुट घातला होता, मात्र बुधवारी सकाळी पुन्हा एकदा अंबानी शीर्षस्थानी पोहोचले.
विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी सकाळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 10 वे स्थान मिळवत गौतम अदानी यांच्याकडून त्यांचा मुकुट परत घेतला. अब्जाधीशांच्या ताज्या यादीत अंबानींनी अदानींना मागे टाकले आहे. बुधवारी सकाळी यादीनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती सध्या $90.3 अब्ज इतकी आहे आणि ते जगातील 10व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. दरम्यान, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती $89.3 अब्ज आहे आणि ते 11व्या क्रमांकावर आहेत.
शुक्रवारी अदानी सर्वात श्रीमंत
फोर्ब्सच्या यादीनुसार अंबानींना 1.4 अब्ज डॉलर आणि अदानी यांना 2.2 अब्ज डॉलरचे नुकसान झाले. या बदलानंतर अब्जाधीशांच्या यादीतही बदल झाला आणि मुकेश अंबानींनी पुन्हा एकदा गौतम अदानींना मागे टाकले. तत्पूर्वी, शुक्रवारी, अदानी फोर्ब्सच्या यादीत दहाव्या स्थानावर होते कारण त्यांची एकूण संपत्ती $637 दशलक्षने वाढून $91.1 अब्ज झाली होती. दुसरीकडे, अंबानी $79.4 दशलक्षच्या तोट्यानंतर 11व्या स्थानावर घसरले आणि सध्या त्यांची संपत्ती $89.2 अब्ज आहे.
अदानी-अंबानी मार्क झुकेरबर्गच्या पुढे
विशेष म्हणजे फेसबुकची मूळ कंपनी मेटाच्या शेअरमध्ये मोठ्या घसरणीमुळे फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग बुधवारी जगातील अब्जाधीशांच्या यादीत १४ व्या क्रमांकावर पोहोचले. अहवालानुसार, त्यांची एकूण संपत्ती 84.8 अब्ज डॉलरवर आली आहे. मेटाचा स्टॉक २६ टक्क्यांहून अधिक घसरल्याने ३७ वर्षीय फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना एका दिवसात ३१ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आणि त्यामुळे ते टॉप १० अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर पडले.
अब्जाधीशांच्या यादीत इलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर
टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क अजूनही अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. मस्क 239 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. टॉप 10 अब्जाधीशांची यादीत जागतिक क्रमवारीत फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट १९४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत, तर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. बुधवारी त्यांची एकूण संपत्ती १८३ अब्ज डॉलर आहे. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स $132 अब्जांसह चौथ्या क्रमांकावर आहेत.
Mukesh Ambani re-emerges as richest man in Asia, overtaking Gautam Adani
महत्त्वाच्या बातम्या
- लखीमपूरचे पडसाद : महाराष्ट्र बंद का केला ते सांगा!!; मुंबई हायकोर्टाची सरकारला ताकीद
- लतादीदींवरील साहित्याचे संदर्शन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची आगळी श्रध्दांजली
- ईडीचा ससेमिरा लावण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान, राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचा आरोप
- पुण्याचा वीजपुरवठा बिघाडामुळे पहाटेपासून ठप्प; उच्चदाब टॉवर लाईनमध्ये गडबड झाल्याने विस्कळीत
- यूपी निवडणूक 2022 : समाजवादी पक्षाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा, बसपा आणि भीम आर्मीबद्दलही केले प्रतिपादन