महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदाची रिक्त जागा प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता भरली आहे. 2003च्या बॅचचे सनदी अधिकारी किशोर राजे-निंबाळकर यांची चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याविषयीची अधिसूनची 26 नोव्हेंबर रोजी काढली. MPSC finally gets President, Retired IAS Officer Kishore Raje-Nimbalkar appointed by Chief Secretary
वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदाची रिक्त जागा प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता भरली आहे. 2003च्या बॅचचे सनदी अधिकारी किशोर राजे-निंबाळकर यांची चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याविषयीची अधिसूनची 26 नोव्हेंबर रोजी काढली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी श्री. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर, भाप्रसे (निवृत्त) यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली असून नवनियुक्त मा. अध्यक्षांनी आज दिनांक 26 नोव्हेंबर, 2021 रोजी पदभार स्वीकारला आहे. pic.twitter.com/jNJ9PAj9Nv — Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) November 26, 2021
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी श्री. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर, भाप्रसे (निवृत्त) यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली असून नवनियुक्त मा. अध्यक्षांनी आज दिनांक 26 नोव्हेंबर, 2021 रोजी पदभार स्वीकारला आहे. pic.twitter.com/jNJ9PAj9Nv
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) November 26, 2021
एमपीएससीला पूर्णवेळ अध्यक्षाची मागणी मागच्या अनेक दिवसांपासून रखडलेली होती. अखेर आता राज्य सरकारने याविषयी निर्णय घेतला असून निंबाळकर यांची सहा वर्षांसाठी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. किशोर राजे-निंबाळकर हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.
निंबाळकर यांच्यापूर्वी सतीश गवई हे आयोगाचे पूर्णवेळ अध्यक्ष होते. ते ऑगस्टमध्ये निवृत्त झाले. तेव्हापासून हे पद दयानंद मेश्नाम यांच्याकडे देण्यात आले. ते निवृत्त झाल्यानंतर आता पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून किशोर निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App