MPSC : परीक्षा पुढे ढकलल्यानंतर परीक्षार्थींना आयोगाचा इशारा! विद्यार्थ्यांची पुन्हा आयोगावर टीका


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2 जानेवारी रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यानंतर आयोगावर प्रचंड टीका करण्यात येत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केला. अनेक विद्यार्थ्यांनी वृत्तपत्रांना मुलाखती दिलेल्या आहेत.MPSC: Commission warns candidates after postponing exams! Students again criticize the commission

तर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 30 सप्टेंबर 2021 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर एक प्रसिद्धिपत्रक जारी केले होते.यानुसार आयोगाच्या कार्यपद्धतीवर किंवा निर्णयावर नाराजी असणार्यांनी सामाजिक सभ्यतेचे भान ठेवून, संसदीय व सुसंस्कृत भाषा शैलीचा वापर करून टीका करणे अपेक्षित आहे.

कोणत्याही उमेदवाराकडून किंवा व्यक्तीकडून विविध प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे यांना अभिप्राय देत असताना असंस्कृत, असंसदीय, अश्लील भाषेचा वापर केला जात असल्याची बाब आयोगाच्या लक्षात आलेली आहे. आणि आयोगाकडून या गोष्टीची गंभीर दखल घेण्यात येईल, असे या पत्रकामध्ये जाहिर करण्यात आलेले आहे.

तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या प्रसिध्दीपत्रका नंतर आयोगावर जोरदार टीका करण्यात येत आहे. एमपीएससी परीक्षा आधी वेळेत घ्या आणि त्यांचे नीट निकाल लावायला शिका. ते करायचे सोडून विद्यार्थ्यांना धमकी देणारे पत्र तुम्ही लिहिण्यात वेळ घालवता आहात.

असभ्य आणि अश्लील टीकेचे समर्थन केले जाणार नाहीच. पण या व्याख्येच्या आडून विरोधात बोलू नये, अशी योजना दिसत आहे. मुळात अशी टीका होणार नाही असा कारभार एमपीएससीने करावा. असा सल्लाही आयोगाला दिला जात आहे.

MPSC: Commission warns candidates after postponing exams! Students again criticize the commission

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण