महाराष्ट्रात आणखी एक मंत्री संशयाच्या भोवऱ्यात, यशोमती ठाकूर यांनी महिला व बालकल्याण विभागात ८०० कोटींचा महाघोटाळा केल्याचा खासदार नवनीत राणा यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री संशयाच्या भोवऱ्यात आहे. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी महिला व बालकल्याण विभागात ८०० कोटी रुपयांचा घोटाळा केला, असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. नवनीत राणा यांनी याप्रकरणी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तक्रार केली आहे.MP Navneet Rana alleges that Yashomati Thakur committed Rs 800 crore scam in Women and Child Welfare Department

उच्च न्यायालयाने ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेल्या कंत्राटदाराला बालकांच्या पौष्टिक आहाराचा ठेका दिल्याचा त्यांचा आरोप आहे. नवनीत राणा यांनी म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने ब्लॅक लिस्ट केलेल्या व महिला बालकल्याण विभागात पुरवठा किंवा कंत्राट घेण्यास मनाई केलेल्या समृद्धी व व्यंकटेश या कपन्यांना पळवाट शोधून मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करून कंझुमर फेडरेशन च्या माध्यमातून पुरवठा करण्याचे काम दिले गेले.



महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आदिवासी शिशुंना शासनातर्फे देण्यात येणारा पौष्टिक आहार व अन्य जरुरी वस्तू न मिळाल्यामुळे गेल्या दोन-तीन महिन्यात मेळघाटात ४९ नवजात शिशुचा मृत्यू झाला.

महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विभागात झालेल्या जवळपास ८०० कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याची सखोल चौकशी करा, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.

नवनीत राणा यांच्या गंभीर आरोपांवर यशोमती ठाकूर यांनी फेसबुक लाईव्ह करत उत्तर दिले आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटातील बालमृत्यूप्रकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला असून काही कंत्राटदारांच्या प्रेमापोटी आज राज्यातील तमाम अंगणवाडी ताईंचा अपमान केला आहे.

महाराष्ट्राचं नाव खराब करायचं काम राणा यांनी केलं आहे, असे प्रत्युत्तर पालकमंत्री तथा महिला व बालसिकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहे. तसेच या संपूर्ण प्रकारामुळे आपण प्रचंड व्यथित असल्याचेही त्यांनी सांगितले.

MP Navneet Rana alleges that Yashomati Thakur committed Rs 800 crore scam in Women and Child Welfare Department

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात