पाकिस्तानचकडून भारताचा टी -20 विश्वचषक सामन्यात पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. या निकालानंतर काही लोक खेळाडूंवर वैयक्तिक हल्ला करत आहेत आणि त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट्सही करत आहेत. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही लक्ष्य करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात अपमानास्पद टिप्पण्या करण्यात आल्या आहेत. तो मुस्लीम आहे यावरून तो पाकिस्तान समर्थक असल्याचा आरोप केला जात आहे. अशा लोकांनी इन्स्टाग्रामवर मोहम्मद शमीच्या पोस्टवर गळ ओकली आहे.Mohammad Shami subjected to abuse after india lose to pakistan t20 world cup 2021
प्रतिनिधी
मुंबई : पाकिस्तानचकडून भारताचा टी -20 विश्वचषक सामन्यात पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. या निकालानंतर काही लोक खेळाडूंवर वैयक्तिक हल्ला करत आहेत आणि त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट्सही करत आहेत. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही लक्ष्य करण्यात आले आहे.
त्याच्याविरोधात अपमानास्पद टिप्पण्या करण्यात आल्या आहेत. तो मुस्लीम आहे यावरून तो पाकिस्तान समर्थक असल्याचा आरोप केला जात आहे. अशा लोकांनी इन्स्टाग्रामवर मोहम्मद शमीच्या पोस्टवर गळ ओकली आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात एकाही भारतीय गोलंदाज कमाल दाखवू शकला नाही. त्यांना एकही विकेट मिळाली नाही. शमीने सामन्यात 3.5 षटके टाकली आणि 43 धावा दिल्या. त्याच्या चेंडूंवर सहा चौकार आणि एक षटकार लगावण्यात आला.
एका युझरने शमीसाठी लिहिले की, टीम इंडियामध्ये पाकिस्तानी आहे. दुसऱ्याने लिहिले, एक मुस्लिम पाकिस्तानच्या बाजूने. तुला किती पैसे मिळाले? अशा काही कॉमेंट्स करण्यात आल्या आहेत. याशिवाय कॉमेंट्स तर अर्वाच्य आहेत, ज्या लिहिल्यासुद्धा जाऊ शकत नाहीत. तथापि, काही युजर्सनी समजूतदारपणाही दाखवला. त्यांनी शमी आणि टीम इंडियाच्या इतर खेळाडूंना पाठिंबा दिला आणि लोकांना शांत राहण्यास आणि खिलाडूवृत्ती राखण्यास सांगितले.
काय घडले सामन्यात?
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, फलंदाजांची खराब कामगिरी आणि गोलंदाजांनी परिस्थितीनुसार गोलंदाजी न केल्यामुळे भारताचा पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव झाला. त्यामुळे गेल्या 29 वर्षांपासून त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्धची त्यांची विजयी मोहीमही संपुष्टात आली.
भारताने 1992 पासून विश्वचषक (ODI आणि T20) मध्ये सर्व 12 सामने (एकदिवसीय आणि T20I मध्ये पाच) जिंकले होते, परंतु प्रथम शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी गोलंदाजांनी (31 धावांत 3 बळी) भारतीय फलंदाजांना घाम फोडला.
नंतर कर्णधार बाबर आझम (५२ चेंडूत नाबाद ६८ धावा, सहा चौकार, दोन षटकार) आणि मोहम्मद रिझवान (५५ चेंडूत नाबाद ७९ धावा, सहा चौकार, तीन षटकार) यांची पहिल्या विकेटसाठीची अखंड शतकी भागीदारी पूर्ण झाली. भारताने 7 बाद 151 धावा केल्या होत्या, पण पाकिस्तानने 17.5 षटकांत बिनबाद 152 धावांवर एकतर्फी विजय नोंदवून विश्वचषक मोहिमेची शानदार सुरुवात केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App