१० ऑक्टोबर २०२० पासून आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. Modi government’s self-reliant Bharat Rozgar Yojana will benefit till March 31
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेवेळी केंद्र सरकारने सुरु केलेल्या महत्वकांक्षी आत्मनिर्भर भारत योजनाचा (ABRY) लाभ आता दिसू लागलाय.रोजगाराच्या दृष्टीने मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेला सुरुवात केली होती.१० ऑक्टोबर २०२० पासून आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
या योजनेत नोंदणीची तारीख वाढवून ३१ मार्च २०२२ करण्यात आली आहे. labour.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करून तुम्ही आत्मनिर्भर भारत योजनेविषयी अधिक माहिती घेऊ शकता.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने अलीकडेच त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ABRY अंतर्गत नोंदणी सुविधेची तारीख वाढवण्याबद्दल ट्विट केले आहे. #ABRY अंतर्गत नोंदणीची सुविधा ३१ .०३.२०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
Registration facility under #ABRY has been extended till 31.03.2022.#ABRY के तहत पंजीकरण सुविधा 31.03.2022 तक बढ़ा दी गई है।#EPFO #Employees pic.twitter.com/aYdiwG7pzc — EPFO (@socialepfo) November 24, 2021
Registration facility under #ABRY has been extended till 31.03.2022.#ABRY के तहत पंजीकरण सुविधा 31.03.2022 तक बढ़ा दी गई है।#EPFO #Employees pic.twitter.com/aYdiwG7pzc
— EPFO (@socialepfo) November 24, 2021
ARBY अंतर्गत नोंदणीची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. EPF आणि MP कायदा १९५२अंतर्गत नोंदणीकृत नवीन कर्मचारी आणि नवीन आस्थापना ३१मार्च २०२२ पर्यंत नोंदणीसाठी पात्र आहेत. अधिक तपशिलांसाठी आणि नोंदणी तपशिलांसाठी, EPFO च्या अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर इच्छुकांना ABRY टॅबवर जावे लागेल.
आत्मनिर्भर भारत रोजगार योजना नियोक्त्यांना रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी तसेच सुरक्षा लाभ मिळवण्यासाठी आणि रोजगार पुन्हा रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. ते म्हणाले की EPFO द्वारे चालवल्या जाणार्या या योजनेमुळे नियोक्त्यावरील आर्थिक दबाव कमी होतो. त्याच वेळी, ते त्यांना अधिक कर्मचारी नियुक्त करण्यास प्रोत्साहित करते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App