उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यास मोदी सरकारची मंजूरी; औरंगाबादच्या नामांतराची प्रक्रिया सुरू

प्रतिनिधी

मुंबई : उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव करण्यास परवानगी दिल्याची माहिती केंद्र सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याबाबतची मंजुरी मिळण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच असल्याची माहितीही केंद्र सरकारने दिली आहे. Modi government approved renaming of usmanabad as dharashiv

गेल्या महिन्यात मुख्य न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला विचारले होते की, महाराष्ट्र सरकारकडून उस्मानाबाद आणि औरंगाबाद या शहरांची नावे बदलण्याचा प्रस्ताव आला आहे का? आणि तसे असल्यास हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे का?

त्यानंतर बुधवारी केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी खंडपीठाला सांगितले की, ‘राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव प्राप्त झाला आहे. केंद्राने २ फेब्रुवारीलाच उस्मानाबादचे नाव बदलण्याबाबत राज्य सरकारला हरकत नसल्याचे कळवले होते. परंतु केंद्राने औरंगाबादचे नाव बदलण्याच्या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. केंद्राची ही बाजू ऐकून मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी २७ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे.

Modi government approved renaming of usmanabad as dharashiv

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात