विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोकणात जाणाऱ्या १८०० चाकरमान्यांना घेऊन ‘ मोदी एक्स्प्रेस’ आज कोकणाकडे रवाना झाली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपा आमदार नितेश राणे यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला.Modi Express leaves for Konkan from Dadar
दादर स्थानकावरुन रेल्वे सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली. या ट्रेनमधील प्रवाशांनी गणपतीची आरती म्हणत प्रवासाला सुरुवात केली.गाडीवर ‘मोदी एक्सप्रेस’ विशेष ट्रेन असे स्टीकर लावले होते. तसेच प्रवशाना विशेष मोफत पास दिले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरही उपस्थित होते.
“मोदीजींच्या संकल्पनेतून २२५ ट्रेन आम्ही कोकणवासीयांसाठी सोडल्या आहेत. महाराष्ट्रात गणपती उत्सव अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. आता ही रेल्वे कोकणात जाणार आहेत. या रेल्वेमुळे कोकणवासी खूश आहेत,” असं मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.
“दरवर्षी मी आपल्यासाठी गणपतीला बस सोडतो. पण यावर्षी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणार आहोत. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देऊन नरेंद्र मोदींनी कोकणाला आशीर्वाद दिला आहे त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी मोदी एक्स्प्रेस सोडत आहोत,” अशी माहिती नितेश राणे यांनी २२ ऑगस्ट रोजी दिली होती.
दादरहून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडीपर्यंत रेल्वे धावणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर ८ वरुन ती सोडली. गणेशभक्तांनी या सेवेबद्दल आनंद व्यक्त करताना गणरायाची आरती गात प्रवासाला सुरुवात केली.मुंबई ते सावंतवाडी या प्रवासात मोदी एक्सप्रेसमध्ये सर्व प्रवाशांना एक वेळचं जेवणदेखील दिलं जाणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App