विशेष प्रतिनिधी
पुणे : अल्पवयीन मुलीला नशेचे इंजेक्शन देऊन मॉडेलिंग’ करणाऱ्या एका ‘रॅपर बॉय’ने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार २५ सप्टेंबर २०२० ते २० जुलै २०२१ या कालावधीदरम्यान घडला. हिंजवडी पोलिसानी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.Model-rapper rapes minor girl by injecting her with drugs
समीर विजय भालेराव (वय २८, रा. मानस लेक, भुकुम, मुळशी) असे त्याचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. समीर हा रॅपर आहे. तो मॉडेलिंग करतो. त्याची त्याच भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. त्यावेळी ही मुलगी १७ वर्षांची होती.
या तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. एक दिवस हा तरुण त्यांच्या घरी गेला. त्यानंतर त्याने या मुलीला जबरदस्तीने स्वतःसोबत नेले. तसेच तिच्या अल्पवयीन भावलाही सोबत घेऊन गेला.
या मुलीला घरामध्ये डांबून ठेवण्यात आले. तिला बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला. तिला नशेचे इंजेक्शन देऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या लैंगिक अत्याचाराची माहिती तिने आईवडिलांना दिली. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. आरोपीने या मुलीला आईवडिलांना मारून टाकण्याची धमकीही दिलेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App