MNS RAJ THAKRE : राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार : कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्यांच्या भेटीनंतर निर्णय

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी राज यांना अयोध्याला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. (raj thackeray to visit ayodhya in diwali) MNS RAJ THAKRE: Raj Thackeray to visit Ayodhya: Decision after meeting Kanchan Giriji and Jagatguru Suryacharya


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी राज यांना अयोध्याला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. राज यांनी हे निमंत्रण स्वीकारलं असून दिवाळीत अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज हे अयोध्येला जाणार आहेत.

कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी आज राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. यावेळी राज यांनी त्यांचं सपत्नीक स्वागत केलं. त्यानंतर राज आणि महंतांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. यावेळी जगतगुरू सूर्याचार्याजी यांनी राज यांना अयोध्येत येण्याचं निमंत्रण दिलं. तसेच अयोध्येत येऊन हिंदूराष्ट्राच्या कार्यासाठी हातभार लावण्याची विनंतीही राज यांना करण्यात आली. राज यांनीही हे निमंत्रण स्वीकारलं आहे. राज यांनी दिवाळीत अयोध्येला जाण्याचा निर्णयही घेतल्याचं सांगितलं आहे.

जगतगुरू सूर्याचार्यजी स्मृतीस्थळावर

दरम्यान, कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्यजी यांनी शिवतिर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी राज यांची भेट घेतली.



राज यांच्यावर टीका

परप्रांतियांचा मुद्दा अज्ञानातून कांचनगिरी मां यांनी काल उत्तर भारतीयांच्या मुद्द्यांवरून राज यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांनी ती भूमिका अज्ञानातून घेतल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आजच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

दरम्यान, राज ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षांपासून हिंदुत्वाचा पुरस्कार केला होता. त्यानंतर आता हिंदुराष्ट्राच्या उभारणीसाठी राज यांनी अयोध्येला जाण्याचं महंतांना आश्वासन दिलं आहे. त्यामुळे राज ठाकरे परप्रांतियांचा मुद्दा सोडून हिंदुत्वाकडे जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज यांच्या या नव्या भूमिकेमुळे मनसे आणि भाजपमध्ये युती होण्याचे संकेतही मिळत आहेत.

MNS RAJ THAKRE : Raj Thackeray to visit Ayodhya: Decision after meeting Kanchan Giriji and Jagatguru Suryacharya

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात