Manipur violence : ‘’… अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल’’ राज ठाकरेंचं विधान!

Raj-Thackeray-10

‘’ह्यातून काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचंच सरकार जबाबदार असेल.’’ असंही राज ठाकरंनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

 इंफाळ : मणिपूरमध्ये दोन महिलांची रस्त्यावर नग्नावस्थेत धिंड काढल्याची  घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे मणिपूरची राजधानी इंफाळपासून 35 किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात 4 मे रोजी ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. यावरून आता पंतप्रधान मोदींनीही तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही प्रतिक्रिया देताना भविष्यातील धोक्या संदर्भात विधान केलं आहे. MNS President Raj Thackerays reaction to the incident of violence in Manipur

राज ठाकरे म्हणतात, ‘’कालपासून मणिपूर मधली समाजमाध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत ती हादरवणारी आहेत, आणि दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत. मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान महोदयांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती की आता तरी ह्या विषयात लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल हे पहा, पण परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. आणि हेच दुर्दैव आहे.’’

त्याचबरोबर ‘’ह्या प्रकरणातील जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. पण त्याचवेळेस जर केंद्रसरकारकडून ठोस कृती होणार नसेल तर, आता राष्ट्रपती महोदयांनी ह्यात लक्ष घालायला हवं.’’असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

याशिवाय, ‘’मणिपूरमध्ये गेल्या ३ महिन्यात जे घडलं त्याने फक्त मणिपूरच नाही तर संपूर्ण भारताच्या समाजमनावर ओरखडा उमटला आहे आणि ह्यातून काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचंच सरकार जबाबदार असेल.’’ असंही राज ठाकरे यांनी लक्षात आणून दिलं आहे.

MNS President Raj Thackerays reaction to the incident of violence in Manipur

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात