‘’हिंदू धर्मीय शांत जरी असले, तरी षंढ नक्कीच नाहीत.’’ असंही नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा भागात रामनवमीच्या आदल्यादिवशी रात्री उफाळलेल्या दंगलीनंतर राजकीय वातावरण देखील तापलं आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याशिवाय विविध प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि भाजपा या सगळ्या षडयंत्रामागे आहे, असा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे तर भाजपाकडूनही यावर प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या घटनेवर ट्वीटद्वारे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. MNS leader Bala Nandgaonkar angry reaction on the riots in Chhatrapati Sambhajinagar
बाळा नांदगावकर म्हणतात, “छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आंनदास ठपका लावणारी घटना घडली. तिथे जमलेल्या जमावाने राम मंदिर परिसरात जोरदार दगडफेक केली. पोलिसांची १२ वाहनं जाळण्याची यांची हिंमत झाली. हिंदू धर्मीय शांत जरी असले, तरी षंढ नक्कीच नाहीत. राज्य सरकार वारंवार सांगतंय की, हे हिंदुत्ववादी सरकार आहे.”
Delhi Excise Policy Case : मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच; न्यायालयाने याचिका फेटाळत जामीन नाकारला!
याचबरोबर “मग हिंदुंचे सरकार असूनही असं करण्याची हिंमत होते, कारण आपण नुसतं बोलतो. आता अॅक्शनची गरज आहे. अलीकडेच नामांतराचा मुद्दा घेऊन या ‘शांतीदूतांनी’ त्या ‘औरंग्या’चे फोटो झळकावले. त्यांना तेव्हाच सोलून काढलं असतं तर त्यांच्यावर जरब बसली असती.’’ असंही नांदगावकर म्हणाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथील धर्मांध हुल्लडबाजीवर मनसे नेते @BalaNandgaonkar ह्यांची प्रतिक्रिया. pic.twitter.com/9wsZJGDycW — MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 31, 2023
छत्रपती संभाजीनगर येथील धर्मांध हुल्लडबाजीवर मनसे नेते @BalaNandgaonkar ह्यांची प्रतिक्रिया. pic.twitter.com/9wsZJGDycW
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 31, 2023
याशिवाय, ‘’आताही केवळ गुन्हे दाखल करून नव्हे तर, येथून पुढे असं करण्याची हिंमत होणार नाही, अशी जिरवली पाहिजे. पक्ष म्हणून जिथे जिथे हिंदू धर्मीय अडचणीत असेल, तिथे मनसे खंबीरपणे तुमच्याबरोबर असेल.” असं मनसेच्यावतीने बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App