
मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत.MLA Shweta Mahale criticizes Nawab Malik in harsh words
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपमधील नेत्यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा आरोप करत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. यावर भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनीही नवाब मलिकांवर जोरदार टीका केली आहे.
श्वेता यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटले की, नवाब मलिकजी, आरोप करताना कुणावर करतोय एवढे तरी भान ठेवाव.! आज वसुबारस, यानिमित्ताने एवढेच म्हणावेसे वाटते,”कावळ्याच्या शापाने गाई गुर मरत नसतात”.
महाराष्टाचे सर्वात यशस्वी मुख्यमंत्र्यांपैकी एक असलेल्या @Dev_Fadnavis यांच्यावर @nawabmalikncp यांच्या सारख्याने केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. जावई बापू ड्रग्ज प्रकरणात अटकेत असल्याने नवाब मियाँ ना ड्रग्जची कावीळ झाली आहे. मेंदू व तब्येत तपासून घ्या.
— Shweta Mahale Patil (मोदी का परिवार) (@MLAShwetaMahale) November 1, 2021
दुसऱ्या ट्विटमध्ये श्वेता महाले यांनी बोचरी टीका केली आहे. महाराष्टाचे सर्वात यशस्वी मुख्यमंत्र्यांपैकी एक असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवाब मलिक यांच्या सारख्याने केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. जावई बापू ड्रग्ज प्रकरणात अटकेत असल्याने नवाब मियाँ ना ड्रग्जची कावीळ झाली आहे. मेंदू व तब्येत तपासून घ्या, असा सल्लाच महाले यांनी दिला आहे.
MLA Shweta Mahale criticizes Nawab Malik in harsh words
- मुस्लिमां बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याने भाजप नेत्यावर एफ आर आय दाखल
- DADRA NAGAR HAVELI ELECTION RESULT : शिवसेनेच्या कलाबेन डेलकरांचा विजय ; भाजपचा 47 हजार 447 मतांनी पराभव
- ‘रा. स्व. संघ एक विशाल संघटन समग्र दर्शन’ पुस्तकाची दुसरी आवृत्ती आली
- केएल राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे करू शकतो नेतृत्व , वरिष्ठ खेळाडूंना दिली जाईल विश्रांती