सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी हे उद्यान होत असून ही अत्यंत आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन आठवले यांनी केले.Minister Ramdas Athavale on a visit to Sangli today; Mata Ramai Ambedkar Park learned about the works
विशेष प्रतिनिधी
सोलापूर : केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आज सांगली दौऱ्यावर आहेत. आठवले यांनी माता रमाई आंबेडकर उद्यान पाहणी केली.आठवले यांनी उद्यानाच्या कामांची माहिती घेतली. त्यांच्या फंडातून मदतीचे आश्वासन दिले.
यावेळी आठवले म्हणले की , माता रमाई आंबेडकर उद्यान विकसीत होत आहे. यामध्ये होत असलेली कामे अत्यंत उत्कृष्ट असून हे उद्यान नागरिक व लहान मुले यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त व आरोग्यदायी ठरेल.सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी हे उद्यान होत असून ही अत्यंत आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन आठवले यांनी केले.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे, समाज कल्याण सभापती सुबराव मद्रासी, माजी महापौर विवेक कांबळे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, नगरसेविका अनारकली कुरणे, संजय कांबळे, संदेश भंडारे आदी उपस्थित होते.
माता रमाई आंबेडकर उद्यानासाठी सव्वासात कोटींचा खर्च होणार आहे.महापालिकेच्या ३२ हजार चौरस फुट खुल्या भूखंडावर माता रमाई आंबेडकर उद्यान विकसीत करण्यात येत आहे. या उद्यानासाठी ७ कोटी २१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
त्यामध्ये बाहेरील बाजूस व मध्यभागात २.७ मीटर रूंदीचे वॉकींग ट्रॅक, सुमारे १२ मीटर उंचीचा क्रांतीस्तंभ, महामानवांचे अर्धपुतळे तसेच ध्यान मंदीर, विहार हाऊस व खुला रंगमंच, स्वागत कमानी आदी कामांचा समावेश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App