कोरोना काळात लाखभर सामान्य मेले; 18 मंत्र्यांची खासगी रुग्णालयांची कोटींची सरकारी बिले!!


विशेष प्रतिनिधी

नाशिक : कोरोनाच्या लाटेमध्ये सर्वसामान्य जनता एकेका बेडसाठी वणवण फिरत असताना महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी मात्र आपल्यावर खासगी रुग्णालयात आरामदायी उपचार घेऊन कोट्यावधींची बिले सरकारी तिजोरीतून भरल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. एक दोन नव्हे तर महाविकास आघाडीतील तब्बल 18 मंत्र्यांनी कोरोना काळात खासगी रुग्णालयात उपचार घेऊन कोट्यावधींची बिले सरकारी तिजोरीतून भरली आहेत. सत्तेचे सर्वाधिक लाभ घेणाऱ्या राष्ट्रवादीचे मंत्री यात सगळ्यात आघाडीवर आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे एकट्याचे बिल 34 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. Millions died in the Corona period; Government bills of crores for private hospitals of 18 ministers!!


चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; चांगचून शहरात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय, रुग्णसंख्या वाढल्याने धास्ती


दिव्य मराठी आणि झी 24 तास वृत्तवाहिनी यांनी ही बातमी दिली आहे. महाविकास आघाडीतील 18 मंत्र्यांनी कोरोना काळात खासगी रुग्णालयात उपचार घेऊन लाखोंची बिलं सरकारी तिजोरीतून भरल्याची माहिती हाती लागली आहे. जनता कोरोना संकटात असताना, सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड मिळवण्यासाठी वणवण फिरत असताना 18 मंत्र्यांनी मात्र, 2 वर्षांत खासगी रुग्णालयातील उपचार घेतले आणि 1 कोटी 39 लाख रुपयांची बिले सरकारी तिजोरीतून दिली.

– सर्वाधिक मंत्री राष्ट्रवादीचे

यामध्ये सर्वाधिक मंत्री हे राष्ट्रवादीचे आहेत. राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी काँग्रेसच्या 6 आणि शिवसेनेच्या 3 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेऊन सरकारी तिजोरीतून पैसे खर्च केले आहेत. स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपेंचंच उपचारासाठी तब्बल 34 लाखांचं बिल झाले आहे. त्यामुळे या मंत्र्यांना सरकारी रुग्णालयांवर भरोसा नाय का असाच सवाल विचारला जात आहे.

खासगी रुग्णालयात उपचार घेणारे मंत्री

  • – सार्वजनिक आरोग्यमंंत्री राजेश टोपे – 34 लाख 40930
  • – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत – 17 लाख 630,879
  • – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ-  14 लाख 56,604
  • – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार – 12 लाख 56,748
  • – गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड – 11 लाख 76,278
  • – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ -9 लाख 3,401
  • – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार – 8 लाख 71,890
  • – जलसंपदामंत्री जयंत पाटील – 7 लाख 30,513
  • – उद्योगमंत्री सुभाष देसाई – 6 लाख 97,293
  • – परिवहनमंंत्री अनिल परब – 6 लाख 79,606

या मंत्र्यांनीही घेतले उपचार

दोन लाखांपर्यंत उपचार घेतलेल्या मंत्र्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण , पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, इतर मागासवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. तर एक लाखापर्यंत उपचार आदिवासी विकास मंत्री  के. सी. पाडवी, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी घेतलेत. तर 50 हजारच्या जवळपास राज्यमंत्री  दत्तात्रेय भरणे, ऊर्जा राज्यमंत्री  प्राजक्त तनपुरे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उपचार घेतले आहेत.

खासगी रुग्णालयात उपचार

बॉम्बे हॉस्पिटल, लिलावती हॉस्पिटल, ब्रीच कँण्डी हॉस्पिटल ,जसलोक हॉस्पिटल ,फोर्टिस हॉस्पिटल, अवंती हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल , केईएम हॉस्पिटल ,आधार हॉस्पिटल आदी खासगी रुग्णालायता मंत्र्यांनी उपचार घेतल्याचे पुढे आले आहे.

Millions died in the Corona period; Government bills of crores for private hospitals of 18 ministers !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात