कुपवाडला मियावाकी जंगल प्रकल्प सुरु; थोड्या जागेत जंगल साकारणार

विशेष प्रतिनिधी

सांगली : कुपवाड येथील एमआयडीसीच्या भूखंडावर तिसरा मियावाकी जंगल प्रकल्प साकार होत आहे. तीन हजार चौरस फूट जागेवर ८५० झाडे लावण्यात आली. Miawaki Forest project started in to Kupwad of sangli District

फाईन ग्रुपचे राहुल देशपांडे, यशवंत तोरो, डॉ. रवींद्र होरा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकल्प सुरू झाला. सुरज फाऊंडेशनचे सचिव एन. जी. कामत आणि प्रकल्प सल्लागार डॉ. हर्षद दिवेकर यांनी या प्रकल्पाची माहिती दिली.

वृक्षतोडीमुळे जगभर ५० टक्के जंगल नष्ट झाले आहे. तेव्हा कमी जागेत जास्त झाडे लावण्याचा प्रयोग हाती घ्यावा लागेल, अस निसर्ग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रवींद्र होरा यांनी नमूद केले.अशा प्रकारचे तीन जंगल प्रकल्प सांगली जिल्ह्यात सुरू झाले आहेत. या प्रकल्पाच्या जागेवर लावण्यासाठी सुरज फाऊंडेशनचे प्रमुख प्रवीण लुंकड यांनी कोकणातून विविध झाडे आणली.

या अगोदर तुंग (ता. मिरज), नांगोळे (ता. कवठे महांकाळ) येथे अशा प्रकारचे जंगल प्रकल्प सुरू करण्यात आले. कुपवाड येथे होणारा हा जिल्ह्यातील तिसरा प्रकल्प आहे. मियावाकी प्रकल्पात जमिनीची आठ फूट खुदाई केली जाते. या ठिकाणी ठरावीक अंतरावर वृक्ष लागवड केल्यानंतर ठिबक पद्धतीने पाणीपुरवठा केला जातो. एका वर्षात या झाडांची उंची पंधरा फूट होते.

  • वृक्षतोडीमुळे जगभर ५० टक्के जंगल नष्ट
  • तेव्हा कमी जागेत जास्त झाडे लावण्याचा प्रयोग
  • मियावाकी प्रकल्पात जमिनीची आठ फूट खुदाई
  • ठरावीक अंतरावर वृक्ष लागवड ; ठिबकने पाणी
  • एका वर्षात या झाडांची उंची पंधरा फूट
  • सांगली जिल्ह्यात तुंग, नांगोळे येथे दोन प्रकल्प सुरू
  • कुपवाड येथे साकारतोय तिसरा प्रकल्प
  • लागवडीसाठी कोकणातून विविध झाडे आणली

Miawaki Forest project started in to Kupwad of sangli District