विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुढे ढकललेल्या म्हाडा परीक्षेसंदर्भातली महत्वाची बातमी. फेब्रुवारीत म्हाडाची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. परीक्षा घेण्यासाठी टीसीएसची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. म्हाडा भरती परीक्षा 1 ते 10 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. MHADA recruitment exam online in February
म्हाडा भरती परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्या जी.एस कंपनीचा करार रद्द करण्यात आला आहे. म्हाडातील 14 पदांसाठीच्या 565 रिक्त जागांसाठी परीक्षा होणार आहे. म्हाडातील 14 पदांसाठीच्या 565 रिक्त जागांसाठी परीक्षा होणार आहे. म्हाडाच्या नोकरभरतीची परीक्षा आता ऑनलाइन होणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी म्हाडाने हा निर्णय घेतला आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होणार आहे. यापूर्वी, गृहनिर्माण प्राधिकरण परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुण्यातील तिघांना अटक केल्यानंतर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) विविध पदांसाठी होणारी भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
लेखी परीक्षा रविवार (12 डिसेंबर), बुधवार (15 डिसेंबर), रविवार (19 डिसेंबर) आणि सोमवार (20 डिसेंबर) अशा चार टप्प्यांत घेण्यात येणार होती. मात्र, सचिवांनी पुढील तारीख न सांगता परीक्षा पुढे ढकलल्याची घोषणा केली होती. अखेरच्या क्षणी स्थगितीच्या निर्णयावर विद्यार्थ्यांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App