विशेष प्रतिनिधी
पुणे : ‘मेट्रो’ मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार आहे. पुण्याच्या विकासाचे आणखी एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. Metro will give Pune a modern identity, Deputy Chief Minister Ajit Pawar inaugurated the trial run
पुणे महापालिका क्षेत्रातील वनाज ते रामवाडी कॉरिडॉरमधील पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उदघाटन अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून सकाळी सात वाजता केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिदधार्थ शिरोळे, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आमदार चंद्रकांत पाटील व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे उपस्थित होते.
पवार म्हणाले, या ऐतिहासिक नगरीचा, आधुनिक इतिहास लिहिताना पुणे मेट्रो रेल्वेच्या कामाचा, आजच्या ट्रायल रनचाही उल्लेख करावा लागेल. पुणे मेट्रोने उर्वरीत काम जलद गतीनं पूर्ण करावे, मेट्रोसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. लॉकडाऊनमध्ये काम सुरु होते. 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. महामेट्रोच्या, पुणे मेट्रोच्या सर्व इंजिनिअर, अधिकारी, कर्मचारी यांनी मोठी मेहनत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
पुणे मेट्रोमुळे वाहतुकीचा, प्रदुषणाचा ताण कमी होईल. वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होईल. पुणेकर निर्धारीत ठिकाणी, वेळेत पोचू शकतील. पुणे मेट्रो पुणे शहरातून ३३.२० किलोमीटर अंतर धावणार आहे. ३० मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या एकूण लांबीपैकी, २७.२८ किलोमीटर मेट्रो रस्त्याच्या समांतर पुलावरुन धावणार आहे. तर बोगद्यातून ६ किलोमीटर मेट्रो धावणार आहे.पुणे मेट्रोच ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. उर्वरीत काम जलद गतीनं पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कोरोनाचे निर्बंधाचे पालन करून मेट्रोचे अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
आयटीचे क्षेत्र म्हणून पुण्याचा प्रभाव वाढत आहे, त्यात मेट्रोची भर पडणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो महत्त्वपूर्ण ठरेल. -डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद
पुणे मेट्रो ट्रायल रन हा ऐतिहासिक क्षण आहे. केंद्र व राज्य शासनाने मेट्रोच्या कामाला गती दिल्याने हा क्षण आज अनुभवता आला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विचार करता मेट्रो ट्रायल रनचे महत्व आहे. – मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे
मेट्रो ट्रायल रन हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. डिसेंबर २०२२पर्यंत मेट्रोचे सर्व मार्ग सुरू होतील.त्यामुळे पर्यावरणास मदत होईल। सोबतच वाहतूक कोंडी कमी होईल, असे त्यांनी सांगितले. – चंद्रकांत पाटील,आमदार, भाजप
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App