विशेष प्रतिनिधी
जळगाव : आधी विलिनीकरण, मगच कामावर येणार, अशी रोखठोक भूमिका चोपडा येथील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली असून शरद पवारांचा प्रस्ताव अमान्य असल्याचे त्यांनी बजावले आहे.Merger first, then attend work; ST staff of chopda is firm, Sharad Pawar’s proposal unaccepteble
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण राज्यभरात एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष ठाकरे- पवार सरकार करत आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी वेतनवाढ केली. मात्र, कर्मचारी विलीनीकरणावर ठाम राहिले आहेत.
तब्बल दोन महिन्यानंतर आज एसटी कामगार संघटनेचे कृती समिती सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक झाली. या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन त्यांनी केले. पण, ज्या मागणीसाठी गेली दोन महिने आम्ही लढा देत आहे.
मग, आज कामावर येण्याचा आग्रह धरून सरकारने विलीनीकरणाची मागणी मान्यच केलेली नाही. त्यामुळे दोन महिन्यानंतर आमच्या पदरात काय पडले ? अशी भूमिका कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे चोपडा येथील एसटी कर्मचारी यांनी जोपर्यंत शासनात विलीनीकरण होत नाही.
तसेच वकील गुणरत्न सदावर्ते याबाबत जोपर्यंत आदेश देत नाहीत तोपर्यंत कर्मचारी दुखवटावर ठाम राहणार आहे. कोणीही कामावर हजर होणार नसल्याचे कर्मचाऱ्यांनी ठामपणे सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App