व्यापाऱ्यांचे उद्या घंटानाद आंदोलन पुण्यातील दुकानाच्या वेळेबाबत आक्रमक पवित्रा


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील दुकाने रात्री सातपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी व्यापारी आक्रमक झाले आहेत. या मागणीच्या पूर्ततेसाठी मंगळवारी(ता.३) घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी महासंघाने दिली आहे.Merchants of Pune urged the government to To allowe them to open shops till 7 pm

पुणे व्यापारी महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊनही वेळेचे नियम लादले असल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. व्यापारी वर्गात असंतोषाचे वातावरण आहे. टास्क फोर्स हा सरकारला घाबरावत आहे. व्यापाऱ्यांमुळे कोरोनाचे संक्रमण होते,



हे स्पष्ट करावे अशी मागणी करण्यात आली. बाजारपेठा बंद ठेऊन सरकारला मदत केली. आता व्यापाऱ्यांची परिस्थिती बिकट झालीय. दुकान बंदीमुळे आर्थिक फटका बसला आहे. कर्ज, कामगारांचे पगार हे प्रश्न जटील झाले आहेत. त्यामुळे आता घंटानाद आंदोलन करून सरकारला जागे करण्यासाठी, न्याय मिळण्यासाठी आंदोलन करत आहोत.

१२ वाजता हे आंदोलन होईल. शहरात १५ मिनिटे हे आंदोलन असेल. सरकारने ऐकले नाहीतर ४ ऑगस्टपासून दुकाने ७ वाजेपर्यंत उघडे ठेऊ अशी भूमिका व्यापारी महासंघाने घेतलीय.

  •  दुकाने रात्री सातपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी द्या
  •  पुणे व्यापारी महासंघाच्या बैठकीत आग्रही मागणी
  • घंटानाद आंदोलन करून सरकारला जागे करणार
  • कर्ज, कामगारांचे पगार हे प्रश्न जटील झाले आहेत
  •  कोरोना कमी होऊनही वेळेचे नियम अयोग्य आहेत
  •  दुकानाची वेळ वाढवून देण्याचा धरला आग्रह
  •  ४ ऑगस्टपासून दुकाने ७ वाजेपर्यंत उघडी ठेवणार

Merchants of Pune urged the government to To allowe them to open shops till 7 pm

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात