मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगार बोंबलून बोंबलून थकलो तरी आमची मागणी पूर्ण होत नाही. यामध्ये यात शंभर टक्के राजकारण होत असल्याचा आरोप माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी केला आहे. माथाडी कामगार हे सर्वपक्षीय असल्याने मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.Mathadi workers are tired by request, but the Thackeray government has failed
विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगार बोंबलून बोंबलून थकलो तरी आमची मागणी पूर्ण होत नाही. यामध्ये यात शंभर टक्के राजकारण होत असल्याचा आरोप माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी केला आहे.
माथाडी कामगार हे सर्वपक्षीय असल्याने मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.माथाडी कामगारांचे नेते आणि सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या नरेंद्र पाटील यांनी माथाडींच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांना वारंवार सांगून देखील ते गांभीयार्ने घेत नसल्याने भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या चारही पक्षांच्या प्रदेश अध्यक्षांना आणि माथाडी बोडार्चे ३६ चेअरमन यांना पत्र व्यवहार केला आहे.
बाजार समितीच्या सर्व घटकांची कृती समिती तयार करण्यात येणार असून बाजार आवारातील सर्व घटकांच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती प्रयत्न करणार आहे. शिवाय, माथाडी कामगारांचं अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणन मंत्री आणि संबंधित अधिकारी यांची जमेल त्या मागार्ने भेट घेऊन हे प्रश्न गांभीयार्ने घ्यावेत, अशी मागणी केलीय. जर सरकारने गांभीयार्ने घेतले नाही
तर येत्या आठवड्यात कशा प्रकारे आंदोलने करायची त्याची दिशा ठरवून एकमताने आंदोलने करण्याच्या भूमिकेत बाजार समितीचे घटक विचार करत आहेत.माथाडी कामगारांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करा माथाडी व बाजार समितीमध्ये काम करणाºया घटकांना अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करावे.
रेल्वे, परिवहन बस व रक्षा कवच यामध्ये समाविष्ट करावे. २०२० मध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्या कामगारांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी कृती समिती स्थापन करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित खात्याच्या मंत्र्यांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय या बैठकीत झाला.
या निवेदनाची जर सरकारने योग्य दाखल घेतली नाही तर आम्ही आंदोलन करून आमच्या हक्कासाठी लढू, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App