घरोघरी गुढ्या उभारून मराठी नववर्षाचे स्वागत करा दणक्यात ; कोरोनामुळे स्वागत यात्रेवर विरजण


वृत्तसंस्था

मुंबई : मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्यावर सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचे संकट आले आहे. राज्यात या दिवशी स्वागत यात्रा काढून नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. यंदा उत्सवावर कोरोनाने विरजण टाकले असले तरी घरोघरी गुढ्या उभारून नववर्षाचे स्वागत नागरिकांना करता येणार आहे. Marathi New Year by Gudhis at home Welcome

गुढिपाडव्याला सर्वच ठिकाणी नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते. याच स्वागत यात्रेची सुरवात डोंबिवली मधून झाली असंही म्हटलं जातं. पण, यंदा उत्सवावर कोरोनाच्या संसर्गानं विरजण टाकलं आहे.



डोंबिवलीमधील प्रसिद्ध श्री गणेश मंदिर संस्थान यांच्या वतीनंस्वागत यात्रेचं आयोजन करण्यात येतं. मात्र कोरोनामुळे मागच्या वर्षी खंड पडला. त्यावेळी पुढच्या वर्षी नव्या उत्साहात  स्वागतयात्रा आयोजित करण्यात येईल असं सांगण्यातही आलं. पण, पुन्हा कोरोनामुळं जीवनाची घडी विस्कटली. ज्यामुळं यंदाच्या वर्षीही डोंबिवली येथील नववर्ष स्वागत यात्रा रद्द केली आहे.

गुढी पाडव्याच्या निमित्तानं शोभायात्रा आणि स्वागत यात्रांचं आयोजन होणार नसलं तरीही कोरोनाचे नियम पाळत पूजाविधी पार पडणार आहेत.

Marathi New Year by Gudhis at home Welcome

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!