माध्यमांनी आधी “ठरवले” फडणवीसांचे मंत्रिमंडळ आणि आता “ठरवले” विरोधी पक्षनेतेही!!


प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकृतरित्या बहुमत गमावण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने राज्यात सत्ता बदलत आहे. देवेंद्र फडणवीस अद्याप मुख्यमंत्री बनायचे आहेत. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनायचे आहेत, पण त्यांच्या शपथविधीपूर्वीच मराठी प्रसार माध्यमांनी अख्खे फडणवीस मंत्रिमंडळ नाव आणि खात्यांसकट परपस्पर “ठरवून” टाकले आहे!! Marathi media themselves declared ajit Pawar and eknath khadse to be opposition leaders in maharashtra legislatives

आता त्या पलिकडे उडी घेत मराठी माध्यमांनी विधानसभा आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते ही ठरवून टाकले आहेत. फडणवीस शिंदे मंत्रिमंडळात भाजपचे 28 आणि शिंदे गटाचे 14 मंत्री बनतील, असे माध्यमांनी परस्पर जाहीर केले आहे. चंद्रकांत दादा पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार यांना माध्यमांनी मंत्री “बनवून टाकले” आहे. पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळातून “वगळून”ही टाकले आहे. तसेच एकनाथ शिंदे गटातील गुलाबराव पाटील, बच्चू कडू, शहाजी बापू पाटील, संदिपान भुमरे आदी नेत्यांनाही मंत्रिपदे देऊन टाकली आहेत.


पोलींसांची नावे ऐकताच थरथर कापणारे, मुतणारे पाहिलेत, आता धाक उरला नाही, एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर


आता त्यापुढे जाऊन प्रसारमाध्यमांनी विधानसभेतले विरोधी पक्ष नेतेपद अजित पवारांना आणि विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते पण एकनाथ खडसे यांना “प्रदान” केले आहे.

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ राजभवनात शपथ घेणार आहे. विरोधी पक्षनेते सभागृहात बसणार आहेत, पण हे सगळे प्रसार माध्यमांच्या कार्यालयांमध्ये एकवटल्याचे माध्यमांनी समजून परस्पर नावे जाहीर करून टाकली आहेत. फडणवीस – पवार, फडणवीस खडसे असे सामने विधानसभा आणि विधान परिषदेत रंगतील, अशी मोठी मनोरथे माध्यमांनी रचली आहेत.

इतकेच नाही तर आता उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांची हकालपट्टी होऊन त्यांच्या जागी आदित्य ठाकरे यांच्याकडे विधानसभेतले गटनेते पद येईल असेही माध्यमांनी परस्पर जाहीर केले आहे.

Marathi media themselves declared ajit Pawar and eknath khadse to be opposition leaders in maharashtra legislatives

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात