विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र अयोग्य असल्याचे मत अभिनेते किरण माने प्रकरणी मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले. Marathi industry pressure system inappropriate; Opinion of Minister Nawab Malik on Actor Kiran Mane case
अभिनेता किरणं माने यांना मालिकेतून काढून टाकले आहे. त्यांच्यावर आरोप आहे की, एका राजकीय पक्षाच्या विरोधात ते लिखाण करत होते त्या मुळे त्यांना मालिकेतून काढल आहे. मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरु आहे, हे योग्य नाही. चॅनलने पुन्हा विचार करून कोणाच्या दबावाखाली दडपण आणून हे होत असेल तर योग्य नाही, असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले.
पाच राज्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस तीन ठिकाणी निवडणूक लढणार आहे. मणिपूरमध्ये आमची काँगेस सोबत लढणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी सोबत एक जागेचा निकाल दिलेला आहे. आणि गोव्यात कोणताही निर्णय झालेला नाही, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
मराठी पाटी बंधनकारक करण्यात आली आहे, काही विशेष वर्गाची लोक याचं विरोध करत आहेत, हे योग्य नाही. काही भाजपची लोक त्यांचे समर्थक ज्या पद्धतीने मराठी पाटीचा विरोध करत आहे हे योग्य नाही, असे ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App