सिनेमा रिलीज होताच ‘या’ अभिनेत्रीने सोशल मीडियातून चाहत्यांना दिली भूमिके विषयी माहिती. Marathi Actress Tejaswini Pandit in new role .
विशेष प्रतिनिधी
पुणे : 500 कोटीच्या बजेटमध्ये तयार झालेला आणि मराठी दिग्दर्शक ओम राऊत त्याने दिग्दर्शित केलेला आदीपुरुष हा सिनेमा अनेक अर्थाने सध्या चर्चेत आहे. अनेकदा हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.रिलीज आधीच या सिनेमाने अनेक विक्रमही प्रस्तावित केले .
अखेर हा सिनेमा आज रिलीज झाला. हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचल्यामुळे या सिनेमाच्या ओपनिंगला जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूने सोशल मीडियावर या सिनेमावर जोरदार टीका देखील होतीय. विशेष करून रावणाच्या भूमिकेत असलेल्या सैफ अली खान वर अनेक मिम्स समाज माध्यमातून फिरत आहेत.
View this post on Instagram A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)
A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)
या सगळ्या सोबतच या सिनेमात आपली मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी पंडित रावणाच्या बहिणीच्या म्हणजेच शुर्पणखेच्या भूमिकेत सिनेमात आहे. ही बातमी आजच समोर आली आहे.
सोशल मीडियात कायम सक्रिय असून देखील . तेजस्विनीने चित्रपट रिलीज होईपर्यंत कोणालाही या भूमिकेविषयी कल्पना दिली नाही. आज तिने चित्रपट रिलीज झाला असता आपल्या भूमिकी विषयी सोशल मीडियात पोस्ट लिहून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. तेजस्विनीने आपल्या भूमिती विषयी सांगताना हटके पोस्ट लिहिले ती म्हणती खऱ्या आयुष्यात जे केलं नाही . ते या सिनेमात केलं. आणि म्हणून कोणाच्या कामात नाक खुपसू नये .मला ‘आदिपुरुष चित्रपटात “शूर्पणखा” म्हणून पाहा..” अशी पोस्ट तिने शेयर केली आहे.या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी या भूमिकेविषयी अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या आहेत . तेजस्विनी मराठी चित्रपट नाटक आणि वेगवेगळ्या वेब सिरीज मध्ये अनेक विविध भूमिकेमध्ये दिसली. त्या सगळ्या भूमिकेचा तिने आपल्या अभिनयातून सोनं केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App