
प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या व्हिडिओमुळे आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडिओ महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणून शेअर केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मराठा क्रांती मोर्चा सोमवारी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे. Maratha Kranti Morcha will file a case on sanjay raut
शनिवारी 17 डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्यावतीने राज्यपाल आणि भाजप नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्चाला तुरळक प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात आला होता. भाजपने मोर्चाला गर्दीच झाली नसल्याचा दावा करत काही फोटो शेअर केले होते. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नॅनो मोर्चा संबोधत विरोधकांना टोला लगावला होता.
देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच!
महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज.
देवेंद्र जी..हे वागणे बरे नाही.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/DReN1k20LS— Sanjay Raut (@rautsanjay61) December 18, 2022
मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडिओ ट्वीट
सत्ताधा-यांच्या टीकेला उत्तर देताना महाविकास आघाडीने काही व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र, संजय राऊत यांनी ट्वीट केलेला व्हिडिओ हा मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात झाली. मराठा क्रांती मोर्चा राऊत यांच्याविरोधात सोमवारी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे. सकाळी 11.00 वाजेपर्यंत मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होईल.
राज्यसभेचे माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी देखील संजय राऊत यांच्यावर याच मुद्द्यावरून टीका केली होती.
Maratha Kranti Morcha will file a case on sanjay raut
महत्वाच्या बातम्या
- Fifa World Cup Final : लिओनेल मेस्सीचे स्वप्न साकार!!; ३६ वर्षांनी अर्जेंटिनाने कोरले फुटबॉल वर्ल्ड कप वर नाव; फ्रान्स पराभूत
- आमदनी अठन्नी, खर्चा रुपया नको; आम्हाला राज्याचा लवासा करायचा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादीवर निशाणा
- अण्णा हजारेंच्या मनातला कायदा शिंदे फडणवीस सरकार आणणार; लोकायुक्त नेमणार