सिंहगडावर अनेकांनी सायंकाळी बिबट्या पहिला; कोणालाही त्रास न देता गेला आपल्या वाटेने

वृत्तसंस्था

पुणे : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या सिंहगडावर बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. पर्यटक आणि वाहनधारकांनी सायंकाळनंतर खबरदारी घ्यावी, असे आवाहन वां विभागाने केले आहे. बिबट्या कोणालाही त्रास न देता आपल्या वाटेने निघून गेल्याची माहिती ज्यांनी ज्यांनी बिबट्या पहिला आहे त्यांनी दिली. Many saw leopards in the evening at Sinhagad; Went his way without bothering anyone

सिंहगड घाटात मालुसरे उद्यान परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिक आणि पर्यटकांनी उपद्रव शुल्क नाक्यावर दिली आहे. संध्याकाळी नागरिकांनी घाटाचा वापर टाळावा, अशा सूचना केल्या आहेत.



 

एका व्यक्ती खेड शिवापुरहून घाट रस्त्याने दुचाकीवरून येत होती. तेव्हा त्याला घाटात बिबट्या दिसला. दुचाकीच्या उजेडात प्रथम कोणता प्राणी आहे ? हे समजले नाही. मात्र मागून येणाऱ्या मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात बिबट्या असल्याचे उघड झाले.

मात्र, हा बिबट्या आपल्या वाटेने कोणालाही त्रास न देता निघून गेला आहे. ही माहिती त्या व्यक्तीने उपद्रव शुल्क नाक्यावर दिली. विशेष म्हणजे त्या व्यक्तीच्या मागून आलेल्या आणखी दुचकीस्वारांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

Many saw leopards in the evening at Sinhagad; Went his way without bothering anyone

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात