पाडव्याच्या मुहूर्तावर राजकारणाला वेग; एकीकडे खर्गेंची ताजपोशी; दुसरीकडे महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारावर खलबतं

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राजकारणाला वेगळा आहे. एकीकडे मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर खलबतं सुरू झाली आहेत. Mallikarjun Kharge has accepted the post of Congress president & Shinde-Fadnavis government’s cabinet expansion continues

मल्लिकार्जुन खर्गे यांनी सुत्रे स्वीकारण्यापूर्वी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या समाधी स्थळी जाऊन दर्शन घेतले. त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली आजच दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठका अपेक्षित असून या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सहभागी होणार आहेत. मुंबईसह 16 महापालिकांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढविण्याची शक्यता आहे. याबाबतचा महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीत होणे अपेक्षित आहे. असा निर्णय झाला तर तो मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षपदावरून घेतलेला पहिला निर्णय असेल. त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीवर होऊन महाविकास आघाडी अधिकृतरित्या फुटेल.



दुसरीकडे मुंबईत काल रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांबरोबर दिवाळी साजरी केली. या दिवाळी सणानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षावर पोहोचले आणि त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांमुळे सुमारे तासभर खलबत्त झाल्याची माहिती आहे. या दोघांच्या चर्चेमुळे मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसलेल्या आमदारांमध्ये एकाच वेळी समाधानाचे वातावरण आणि दुसरीकडे मंत्रिमंडळ समावेशात स्थान मिळवण्याची धाकधूक वाढली आहे

त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांना स्थान मिळू शकणार नाही अशा आमदारांची राजकीय सोय 75 महामंडळांमध्ये लावण्याची देखील तयारी शिंदे – फडणवीस यांनी केली आहे. कारण कायद्यानुसार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 43 मंत्री असू शकतात. इच्छुकांची संख्या तर दुप्पट आहे. मग अशावेळी बाकीच्या इच्छुकांची सोय महामंडळाच्या अध्यक्ष, कार्यकारी संचालक वगैरे पदांवर लावण्याची शिंदे – फडणवीस यांनी तयारी केली आहे.

एकूण पाडव्याच्या मुहूर्तावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे कारण महापालिका निवडणुका खऱ्या अर्थाने दिवाळीनंतर तोंडावर आल्याचे दिसत आहे या निवडणुका जानेवारीत होणे अपेक्षित आहे.

Mallikarjun Kharge has accepted the post of Congress president & Shinde-Fadnavis government’s cabinet expansion continues

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात