महाराष्ट्रातील मालेगाव बॉम्बस्फोटातील एका साक्षीदाराने विशेष एनआयए न्यायालयात केलेल्या खुलाशामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सुनावणीदरम्यान या साक्षीदाराने सांगितले की, त्याला महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि स्वामी असीमानंद आणि इंद्रेश यांच्यासह चार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना गोवण्यासाठी दबाव टाकला होता. Malegaon Blast: Witness testifies during hearing – ATS puts pressure on central leaders, including Yogi Adityanath
वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रातील मालेगाव बॉम्बस्फोटातील एका साक्षीदाराने विशेष एनआयए न्यायालयात केलेल्या खुलाशामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सुनावणीदरम्यान या साक्षीदाराने सांगितले की, त्याला महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि स्वामी असीमानंद आणि इंद्रेश यांच्यासह चार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना गोवण्यासाठी दबाव टाकला होता.
त्याचवेळी या प्रकरणातील आरोपी समीर कुलकर्णी याने या साक्षीदाराच्या खुलाशाची माहिती एका दूरचित्रवाहिनीला दिली आहे. कुलकर्णी म्हणाले की, परमबीर सिंग आणि राव नावाच्या अधिकाऱ्याने योगी आदित्यनाथ यांच्यासह या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चार नेते इंद्रेश कुमार, स्वामी असीमानंद, काका जी आणि देवधर यांची नावे घेण्यासाठी दबाव टाकल्याचे साक्षीदाराने न्यायालयाला सांगितले.
त्याने सांगितले की, साक्षीदाराला प्रथम मुंबई आणि पुणे येथील एटीएसच्या कार्यालयात बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले, तेथे त्याच्यावर दबाव आणला गेला तसेच इतर पाच जणांची नावे सांगितल्यास त्यांना सोडले जाणार नाही आणि त्यांना अटक केली जाईल, वाईट परिणाम होऊ शकतात अशी धमकी दिली. काल आपले म्हणणे मागे घेणाऱ्या १५व्या साक्षीदाराने एनआयए कोर्टात आपले पाच पानांचा जबाब नोंदवला आहे.
29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9.35 च्या सुमारास मालेगाव येथे शकील गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनीसमोर बॉम्बस्फोट झाला. एलएमएल मोटरसायकलमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 101 जण जखमी झाले होते. स्फोटानंतर ३० सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे प्रकरण दहशतवादाशी संबंधित असल्याने महाराष्ट्र सरकारच्या आदेशानंतर महाराष्ट्र एटीएसने या प्रकरणाचा तपास हाती घेतला आणि 21 ऑक्टोबर 2008 रोजी एफआयआरमध्ये UAPA आणि MCOCA ची कलमे लावण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App