पेट्रोल – डिझेल दर कपातीवरून महाविकास आघाडीची महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक!!


प्रतिनिधी

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरच्या उत्पादन शुल्कात 8 रुपयांनी घट केल्यानंतर महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या सरकारने देखील पेट्रोल – डिझेलवरच्या मूल्यवर्धित करात कपात केल्याची घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात हा निर्णय घेतला नसल्याचे उघड झाले आहे. पेट्रोल – डिझेलची झालेली दर कपात हा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम आहे. Mahavikas Aghadi throws dust in the eyes of the people of Maharashtra over petrol-diesel price cuts

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून महाविकास आघाडी सरकारची पोलखोल केली आहे.

– या पोस्टमध्ये फडणवीस म्हणतात :

– महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे.

– इंधनाची मूळ किंमत, विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन, रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस तसेच अ‍ॅग्रीकल्चर अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस अशा सर्व बाबींवर राज्य सरकार करआकारणी करते. त्यामुळे यापैकी कोणत्याही घटकातील कर केंद्राने कमी केला तर राज्याचा कर आपोआप कमी होतो.

– त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलवर 2.08 रुपये आणि डिझेलवर 1.44 रुपये जे कमी झाले, तो रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्र सरकारने कमी केल्याने राज्याचा कर कमी झाला आहे. स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचे सुद्धा श्रेय घ्यायचे, हे फारच गंभीर आहे.

– महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल – डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा, ही माझी पुन्हा मागणी आहे.

– कालची घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असे मी म्हटले होते. पण, प्रत्यक्षात तर हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला.

Mahavikas Aghadi throws dust in the eyes of the people of Maharashtra over petrol-diesel price cuts

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात