वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात कोरोनाचा धोका वाढत असतानाच रुग्णसंख्या वाढत असताना अनेक रुग्ण बरे होत असल्याची दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या 24 तासांत 29,177 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. Maharashtra reports 26,672 new cases, 29,177 recoveries, and 594 deaths in the last 24 hours.
राज्यात रुग्णसंख्या 55 लाखांवर पोचली आहे. रविवारी ( ता.23 ) कोरोनाचे 26,672 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 594 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 55,79,897 पोचली आहे. मृत्यू झालेल्यांचा आकडा देखील वाढला आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत असली तरी अनेकांनी आजारावर मात केली आहे.
गेल्या 24 तासांत 29,177 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. लॉकडाऊनमुळे आता कुठे परिस्थिती आटोक्यात येत आहे. कोरोना चाचण्या जशा होतात तसे कोरोना रुग्णांच्या संख्येत कमी जास्त वाढ होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App