Maharashtra Political Crisis : ‘’आता आम्हीच सर्वात मजबूत विरोधी पक्ष’’ म्हणत, काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर ठोकाला दावा!

Sharad Pawar Says Three Parties Should Decide Assembly Speaker

शरद पवारांनी कालच जितेंद्र आव्हाडांना विरोधी पक्षनेते  पदाची दिली होती जबाबदारी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू आहेत. एकीकडे राष्ट्रवादीत महाबंडखोरी झाल्यानंतर आता महाविकास आघाडीतील घटक पक्षात विरोधी  पक्षनेते पदासाठी चढाओढ सुरू झाल्याचे दिसत आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवारांनी काल जितेंद्र आव्हाडांना विरोधी पक्षनेते  पदाची जबाबदारी दिल्यानंतर, आज काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकला आहे. Maharashtra Political Crisis Now we are the strongest opposition party Congress claimed the post of leader of the opposition

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत की, विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचाच असावा. या मुद्द्यावर काँग्रेसची बैठकही होणार आहे. तसेच, ज्याच्याकडे जास्त संख्याबळ असेल त्याच पक्षाचा विरोधी पक्षनेते केला जाईल, असेही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

‘’आता काँग्रेस हा विरोधी पक्षातील सर्वात मजबूत पक्ष आहे. आमचे आमदार पक्षात अबाधित आहेत. 2019 मध्ये आमचे 44 आमदार होते, आता आमचे 45 आहेत. काँग्रेस महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेतेपदाची मागणी करणार आहे. उद्याही या विषयावर बैठक होणार आहे.’’ असं थोरात म्हणाले आहेत.

याशिवाय, महाविकास आघाडीला जनतेचा पाठिंबा असल्याने महाविकास आघाडी अधिक मजबूत होईल, आम्ही पुढील धोरणावर चर्चा करू. महाविकास आघाडीची बैठकही लवकरच होणार आहे. असेही यावेळी थोरात यांनी सांगितले.

Maharashtra Political Crisis Now we are the strongest opposition party Congress claimed the post of leader of the opposition

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात