MAHARASHTRA LOCKDOWN: रोल-कॅमेरा-एक्शन बंद;सिनेमा आणि मालिकांना करोडोंचा फटका


  • अक्षय कुमारच्या’रक्षाबंधन’ चित्रपटाचे शूट येत्या आठवड्यापासून होणार आहे. यासाठी मुंबईतील मीरा भाईंदर भागात ‘जीसीसी हॉटेल आणि क्लावॅब’ बुक करण्यात आलं आहे. तेही आता थांबवण्यात आलं आहे. प्रीतीश नंदी ‘फोर मोर शॉट्स’ च्या तिसर्‍या सीझनचे शूटिंग करत होते. तेही आता थांबविण्यात आले आहे.

  • महाराष्ट्रातील कोरोना कर्फ्यूमुळे बिग बजेट चित्रपट अडकले आहेत. यात शाहरुख खानचा ‘पठाण’, सलमान खानचा ‘टायगर 3’, आलिया भट्टचा ‘डार्लिंग्स’, ‘गंगूबाई काठियावाडी’, अक्षय कुमारचा ‘राम सेतु’, ‘रक्षाबंधन’, रणवीर सिंगचा करण जोहर फिल्म आणि नुसरत भारूचा यांच्या मोठ्या प्रोजेक्ट्स आहेत.

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : कोरोनाचे रूग्ण वाढत असताना महाराष्ट्र सरकारने कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या रूग्ण संख्येचा मालिका आणि सिनेमांवरही परिणाम झाल्याचं दिसतंय.MAHARASHTRA LOCKDOWN EFFECT ON BOLLYWOOD

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेल्या बंदीच्या निर्णयावर इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स एसोसिएशन, चॅनेल्स आणि गिल्ड फ़ेडेरेशन याची बैठक झाली. या बैठकीदरम्यान 15 दिवस मालिका आणि सिनेमांचं शूटींग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

फिल्म इंड्स्ट्रीचे 11 करोड रूपये फसले असल्याचं म्हटलं जातंय. त्याचप्रमाणे 11 सिनेमांची प्रदर्शन थकलं असून मुंबईत 25 हून अधिक मालिकांच्या शूटींवर परिणाम होणार आहे.

 

सर्व चित्रपट, मालिका आणि जाहिरातींना आपलं चित्रीकरण 15 दिवसांसाठी थांबवावं लागणार आहे. त्यामुळे सर्वच निर्मात्यांना करोडोंचा फटका सहन करावा लागणार असल्याची भीती निर्माण झाली आहे.

या निर्णयामुळे येत्या 15 दिवस चित्रपटगृहे बंद राहणार आहेत. त्यामुळे येत्या 2 आठवड्यांत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांवर ग्रहण लागलं आहे. ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लोयीज’ चे अध्यक्ष बी.एन.तिवारी यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारचा हा निर्णय आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता. त्यामुळे आमच्या नियमित कर्मचाऱ्यांच मोठं नुकसान होणार आहे.

कॉस्ट्यूम डिझायनर अरुण जे. चौहान यांनी सांगितले की, ‘आमचे काम पूर्णपणे बंद आहे. कारण आम्ही बाहेर न जाता खरेदी करू शकत नाही किंवा तयारी करू शकत नाही. या क्षणी, इम्तियाज अलीच्या बॅनरवर ‘ती’ च्या दुसर्‍या सीझनचे शूटिंग सुरू आहे.

सध्या मुंबई मध्ये चित्रपट आणि मालिका मिळून 100 चित्रीकरण चालू आहेत. आणि काही मोठ्या चित्रिकरणानां प्रतीक्षेत ठेवण्यात आलं आहे. आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या वर्षीच्या काही अहवालानुसार लॉकडाऊन मध्ये चित्रपटसृष्टीला तब्बल 8 हजार कोटींचं नुकसान झालं आहे.

MAHARASHTRA LOCKDOWN EFFECT ON BOLLYWOOD

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात