maharashtra lockdown 2021 news :कोरोनाच्या संचारबंदीच्या वेळेत बदल ; राज्याचा नियम पुण्यासाठी का लागू नाही ? नागरिकांचा सवाल


वृत्तसंस्था

पुणे : राज्यासाठी लागू केलेले लॉकडाऊनचे नियम विशेषतः संचारबंदीच्या वेळेत पुण्यात फरक केला आहे. राज्याचे आणि महापालिकेच्या नियमांवरून नागरिक संभ्रमित झाले आहे. कोरोना हा एकच असताना संचारबंदीचे नियम मात्र ,वेगळे का ? असा प्रश्न विचारला जात आहे. maharashtra lockdown 2021 news Changes in corona curfew timing; Why the state rule does not apply to Pune? Citizens’ question

राज्यात 15 दिवसांचा कडक निर्बंध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. परंतु, पुणे परिसरामध्ये अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी उघडी ठेवण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. पण, राज्याच्या निर्बंधामध्ये दुकानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 8 अशी उघडी ठेवायची आहेत.पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी आज शहरासाठी कोरोनाबाबतची नवी नियमावली जाहीर केली. त्यात ही बाब प्रकर्षाने जाणवली आहे.

पुण्यातील व्यापारी नाराज ; न्यायालयात जाणार

दरम्यान, राज्यात सरकारने 15 दिवस संचारबंदी लागू केली आहे. परंतु, अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवे अंतर्गत व्यवसायास परवानगी दिली. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून नेमके काय सुरु काय बंद हेच कळेनासे झाले आहे.

त्यामध्ये सार्वजनिक वाहतूक, रस्त्याकडेला खाद्यपदार्थ विक्री, पेट्रोल, धान्य विक्री, बँका, उद्योग आदी ठिकाणी संचारबंदीचे कुठे पालन होणार आहे, अशी टीका पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केली. सरकारने खरे तर संपूर्ण लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली. सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे ते म्हणाले.

maharashtra lockdown 2021 news Changes in corona curfew timing; Why the state rule does not apply to Pune? Citizens’ question

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण