Maharashtra Lockdown 2.0 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेशी संवाद साधणार,लॉकडाऊनची घोषणा?

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन आता अटळ आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यात ते लॉकडाऊनची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंआहे.Maharashtra Lockdown 2.0 : Chief Minister Uddhav Thackeray address state today on the outbreak of corona

गेल्या तीन दिवसांपासून लॉकडाऊन लावण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसह अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लॉकडाऊनबद्दल नियमावली तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजेच्या सुमारास जनतेशी संवाद साधणार आहेत.

दरम्यान,  मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घोषणा करतील अशी माहिती दिली होती. “महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच निर्णय घेतील. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली आजच तयार होईल”, असं मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं होतं.

Maharashtra Lockdown 2.0 : Chief Minister Uddhav Thackeray address state today on the outbreak of corona