विशेष प्रतिनिधी
मुंबई – मुंबईसह कोकणात पुढील चार दिवस पावसाची परिस्थिती अशीच राहणार असून, पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह कोकणात मुसळधार कोसळणारा मान्सून आज राज्यात सगळीकडे पोचला. मुंबई, कोकण, मराठवाड्यासह राज्यभरात पाऊस चांगला बरसणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली. Maharashtra is experiencing torrential monsoon for the next four days in Konkan including Mumbai
राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर राज्यात लवकरच मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता.
अखेर मान्सूनने महाराष्ट्रात हजेरी लावली. यंदा राज्यातही सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे; मात्र मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान विभागाकडून पुढील चार दिवसांसाठी मुंबईत ‘ऑरेंज अलर्ट’ तर कोकणासाठी काही ठिकाणी ‘रेड अलर्ट’ तर काही ठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App