शक्ती विधेयक कायदा नागपूर अधिवेशनात संमत करण्याची तयारी


ठाकरे पवार सरकार मधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अचानक पदावरून जावे लागले. या पार्श्वभूमीवर रखडलेला शक्ती विधेयक कायदा येत्या अधिवेशनात संमत करण्याची सरकारची तयारी असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. Maharashtra Home Minister Dilip Walse expressed his will to pass Shakti Law in upcoming assembly session.


प्रतिनिधी

नागपूर : महिला अत्याचार रोखण्यासाठीचे प्रलंबित शक्ती कायदा विधेयक आगामी नागपुरातील हिवाळी अधिवेशनात संमत करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. त्यासाठी संयुक्त निवड समितीच्या अहवालावर लवकरच चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

नागपुरातील पोलीस निवासस्थानाच्या नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. नागुपरचे पालकमंत्री नितीन राऊत, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी आणि नवीनचंद्र रेड्डी आदी यावेळी उपस्थित होते.

गृहमंत्री वळसे पाटील यांनी शुक्रवारी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. तसेच गिट्टीखदान पोलीस ठाण्यासह शहरातील अन्य आठ पोलिस ठाण्यातील महिला विश्रामगृहाचे उद्घाटनही त्यांनी केले.

सध्या ऐरणीवर असलेल्या अमली पदार्थांच्या प्रसारावर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “नशिल्या पदार्थांच्या विळख्यात सापडून तरुणाई उध्वस्त होऊ शकते. हे ध्यानात घेऊन पोलिसांनी आता
नक्षलवाद आणि दहशतवादा इतकेच लक्ष गांभीर्याने अमली पदार्थाच्या तस्करीतही द्यावे.” दहशतवाद आणि नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस ज्या सतर्कतेने आणि आक्रमकपणे काम करतात तशाच प्रकारे आता अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी पोलिसांना काम करावे लागणार आहे. त्यासाठी शाळा महाविद्यालयाच्या अवती-भवतीही पोलिसांना नजर रोखावी लागेल, असे वळसे-पाटील म्हणाले.

पोलिसांचे संख्याबळ वाढवण्यासाठी १२ हजार पोलिसांच्या भरतीचे उद्दीष्ट सरकार समोर असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पोलीस दलात भरती होणारा शिपाई उपनिरीक्षक म्हणूनच रिटायर्ड होईल, असेही ते म्हणाले. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालाकडे लक्ष वेधत नागपूरचा क्राईम रेट कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज वळसे-पाटील यांनी व्यक्त केली. “पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला आदराची आणि न्यायाची वागणूक मिळाली पाहिजे.
कायदा आणि सुव्यवस्थेची घडी राखण्यासाठी दक्ष राहून काम करा,” अशी सूचना वळसे-पाटील यांनी केली.

Maharashtra Home Minister Dilip Walse expressed his will to pass Shakti Law in upcoming assembly session.

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात