विशेष प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्रात रस्त्यावरील गर्दीला ब्रेक लावण्यासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली. त्यानुसार किराणा, भाजीपाला-फळे, डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व खाद्यपदार्थांची दुकाने सकाळी ७ पासून ११ वाजेपर्यंत उघडी राहतील. २० एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत नवे निर्बंध लागू राहतील. संबंधित दुकानांमधून सकाळी ७ पासून रात्री ८ पर्यंत घरपोच सेवा देता येणार आहे. Maharashtra govt. declares new rules of lockdown
नव्या नियमावलीनुसार चिकन, मटण, कोंबडी, मासे आणि अंडी यांसह कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांचे खाद्य, पावसाच्या हंगामासाठीचे साहित्य (वैयक्तिक व संघटनात्मक) इत्यादी दुकाने सकाळी ७ पासून ११ पर्यंत सुरू राहतील.
अशी आहे नवी नियमावली
• किराणा, भाजीपाला, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व खाद्यपदार्थ (चिकन, मटण, कोंबडी, मासे आणि अंडीसह), कृषी अवजारे व उत्पादने, पाळीव प्राण्यांचे खाद्य, पावसाच्या हंगामासाठी साहित्य आदी दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू राहतील.
• स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला वाटल्यास ते कलम दोनअंतर्गत काही गोष्टींना व सेवांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संमती घेऊन आवश्यक सेवा म्हणून घोषित करू शकते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App