“करून दाखविले”; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल नव्हे, पण इंपोर्टेड दारूवरील उत्पादन शुल्क 50 टक्क्यांनी घटविले


वृत्तसंस्था

मुंबई ; केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव उत्पादन शुल्क घटवून कमी गेले. महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यांनी त्यावरचा मूल्यवर्धित कर घटवलेला नाही. त्यामुळे तिथे पेट्रोल डिझेलचे भाव पुरेसे कमी झालेले नाहीत.Maharashtra cuts excise duty on imported liquor by 50 percent

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इम्पोर्टेड दारूवरील आयात शुल्कात 50 टक्‍क्‍यांनी घट केली आहे. त्यामुळे स्कॉच व्हिस्की ह्या सारखी दारू 35 ते 40 टक्के स्वस्त होईल अशी माहिती दारू उत्पादक आणि विक्रेता संघटनेने दिली आहे. महाराष्ट्राचे आयात दारूच्या उत्पादनातून साधारण दोनशे कोटींचे उत्पन्न मिळते. परंतु गेल्या तीन वर्षांमध्ये हे उत्पन्न घटून शंभर कोटींवर आले आहे. यामध्ये कोरोना काळाचाही समावेश आहे. आयात दारू खूप महाग असल्याने काही प्रमाणात कमी झाले होते. त्याचा आयातीवर ही परिणाम झाला होता, अशी माहिती संघटनेने दिली आहे.


केंद्र सरकार राज्यांना जीएसटीची रक्कम परत देतेच, पण महाराष्ट्राने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करावा; फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर


मात्र आता महाविकास आघाडी सरकारने इम्पोर्टेड दारूच्या उत्पादन शुल्कात 50 टक्के घट केल्याने प्रत्यक्षात त्या दारूच्या किमती मध्ये 35 ते 40 टक्क्यांची घट होईल आणि कदाचित दारूचे सेवन वाढेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल – डिझेल वरचे उत्पादन शुल्क कमी करून पाच ते दहा रुपयांची सवलत सर्व देशभर दिली. राज्य सरकारांनी पेट्रोल-डिझेल वरचा मूल्यवर्धित कर कमी करावा, असे आवाहन देखील केले. परंतु महाराष्ट्राच्या महाविकास सरकारने अद्याप तो निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर यासारख्या शहरांमध्ये अजूनही पेट्रोलचे भाव हे शंभरी पारच आहेत. या पार्श्वभूमीवर इम्पोर्टेड दारूच्या उत्पादन शुल्कात 50 टक्क्यांची घट करणे या निर्णयाकडे पहावे लागणार आहे.

Maharashtra cuts excise duty on imported liquor by 50 percent

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी