महाराष्ट्रात सहकारी बँकेत अकाउंट ओपनिंग घोटाळा उघडकीस; 1200 खात्यांवर बँक कर्मचाऱ्यांचेच अंगठे!!


  • 54 कोटी रुपये प्राप्तिकर खात्याने केले जप्त!! Maharashtra Co-operative Bank Account Opening Scam Revealed; Thumbs of bank employees on 1200 accounts !!

वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रात एका नागरी सहकारी बँकेत अकाउंट ओपनिंगचा घोटाळा उघडकीस आला असून केंद्रीय प्राप्तिकर खात्याने सुमारे 54 कोटी रुपये बँकेच्या संबंधित सहकारी बँकेच्या मुख्यालयातील तपासणीनंतर जप्त केले आहेत.

येथेच सहकारी बँकेचा घोटाळा उघडकीस आला असून तब्बल 1200 खाती पॅन कार्ड शिवाय आहे आणि केवायसी ओळख पटविल्याशिवाय उघडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच खाती उघडताना त्यावर अंगठे उठविल्याचे आणि शिक्के मारल्याचे उघडकीस आले आहेत. ही बँक खाती नेमकी कोणाची आहेत याचा तपशीलवार तपास सुरू आहे.



याच दरम्यान बँकेत सर्च ऑपरेशन केले असता तेथे सुमारे 54 कोटी रुपये बेहिशेबी आढळले. ते प्राप्तिकर खात्याने जप्त केले आहेत. 27 सप्टेंबरला हे सर्च ऑपरेशन करण्यात आले आहे, अशी माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस खात्याने अधिकृतरीत्या दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातली ट्विट केले आहे.

Maharashtra Co-operative Bank Account Opening Scam Revealed; Thumbs of bank employees on 1200 accounts !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात