लोणंद मुक्कामी वारकऱ्यांचा मेळा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण आज चांदोबाचा लिंब येथे


प्रतिनिधी

सातारा : सातारा जिल्ह्यात माऊलींचे लोणंदला दोन, तरडगावला एक, फलटणला दोन तर बरडला एक असे एकूण सहा मुक्काम होणार आहेत. माऊलींचा पालखी सोहळा लोणंद मुक्कामी आल्यावर कोकणासह राज्यातून येणाऱ्या अनेक दिंड्या माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्याने भाविकांची संख्या लोणंद मुक्कामी वाढली आहे.Lonand First Ringan of Santshrestha Dnyaneshwar Maharaj Palkhi today at Chandobacha Limb

कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो भाविकांनी लोणंद मुक्कामी संत ज्ञानेश्वर महाराजाच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे. माऊलीची दर्शन रांग पालखीतळ ते खंडाळा चौक ते सातारा रोड जुनी भाजी मंडई अशी सुमारे 1 किलोमीटरपर्यंत गेलेली होती. लोणंद मुक्कामी लोणंदकर ग्रामस्थ वाजत गाजत येऊन माऊलींना मानाचा नैवेद्य अर्पण करत होते. लोणंद मुक्कामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची व भाविकांची कसलीही गैरसोय होऊ नये म्हणुन जिल्हा प्रशासन सतर्क राहुन काम करत आहे.लोणंद नगरपंचायत मदत कक्षामध्ये नगरपंचायत, आरोग्य विभाग, महसुल, पंचायत समिती, विज वितरण आदी विभागाचे विभाग प्रमुख सोहळ्यातील भाविकांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करताना दिसत होते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा लोणंद मधुन गुरुवारी दुपारी पुढील वाटचालीसाठी मार्गस्थ होणार आहे.

चांदोबाचा लिंब येथे गुरुवारी होणार उभे रिंगण

गुरुवार दि. ३० रोजी दुपारी एक वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तरडगाव मुक्कामासाठी लोणंद पालखी तळावरून मार्गस्थ होणार आहे. लोणंद -फलटण रोडवर लोणंद नजीक चांदोबाचा लिबं या ठिकाणी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिगंण होणार आहे.

Lonand First Ringan of Santshrestha Dnyaneshwar Maharaj Palkhi today at Chandobacha Limb

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था