सिनेउद्योगाचा लॉकडाऊनला विरोध, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना लिहिले पत्र

गेले वर्ष अत्यंत वाईट अवस्थेत गेल्यावर पुन्हा लॉकडाऊन लावून मागचेच दिवस पुढे आणू नका, असे म्हणत सिनेउद्योगाने लॉकडाऊनला विरोध केला आहे. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.Letter written to Chief Minister Uddhav Thackeray opposing the lockdown of the film industry


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : गेले वर्ष अत्यंत वाईट अवस्थेत गेल्यावर पुन्हा लॉकडाऊन लावून मागचेच दिवस पुढे आणू नका, असे म्हणत सिनेउद्योगाने लॉकडाऊनला विरोध केला आहे. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.

दरम्यान, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (एफडब्ल्यूईसी) ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानांचे पत्र लिहिले आहे. या पत्रात एफडब्ल्यूआयसीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात लॉकडाउन लावू नये असे म्हटले आहे.एफडब्ल्यूआयसीचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी या पत्राची प्रत सोशल मीडियावर शेअर केली आहे. पंडीत यांनी म्हटले आहे की, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एफडब्ल्यूईसी मुंबई तुम्हाला पुन्हा महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउन न लावण्याची विनंती करता आहे.

कारण यामुळे इंडस्ट्रीत भीती निर्माण होईल. ही इंडस्ट्री आधीच वाईट अवस्थेतून जात आहे. आम्ही महाराष्ट्र सरकारला त्यांच्या एसओपी आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार संपूर्ण सावधगिरी बाळगत असल्याचे आश्वासन देतो. गेल्या एका वर्षात कोरोनामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीवर वाईट परिणाम झाला आहे.

बॉलिवूडमध्ये कोरोनाचा धोका सतत वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेत्री आलिया भट्ट.फातिमा सना शेख, बप्पी लहरी, आमिर खान, आर माधवन, परेश रावल, मिलिंद सोमण, रोहित सराफ, सिद्धांत चतुवेर्दी, रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, कार्तिक आर्यन, संजय लीला भन्साळी आणि सतीश कौशिक यांना कोरोनाची लागण झाली होती.

Letter written to Chief Minister Uddhav Thackeray opposing the lockdown of the film industry

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*