महाराष्ट्रात कायदा – सुव्यवस्थेचे तीन तेरा आणि महिला अत्याचारांचा कळस…!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेतच, पण त्यातही महिलांवरच्या अत्याचारांनी अक्षरश: कळस गाठला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात असे एकही गाव शिल्लक नाही, एकही शहर असे शिल्लक नाही जिथे महिला अत्याचाराच्या घटना घडलेल्या नाहीत.Law and order in Maharashtra – three thirteen and the culmination of women’s atrocities

नोंद केलेल्या घटना शहारे आणणाऱ्या आहेतच, पण नोंद न केलेल्या घटना किती असतील याची नुसती कल्पनाच केलेली बरी…!! महाराष्ट्राचे हे भीषण वास्तव मांडणारी ही आकडेवारी पाहिली की या खऱ्या पुरोगामी महाराष्ट्राची फक्त पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्‍यांनी अक्षरश: वासलात लावल्याचे स्पष्ट दिसते.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातल्या महिला अत्याचारांच्या घटनांची मोठी यादीच सादर केली. या यादीतून महाराष्ट्रातल्या महिला अत्याचाराचे भीषण वास्तव समोर आले आहे. ही यादी पुढीलप्रमाणे :

 •  3 फेब्रु 2020- नागपूर- हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून भर रस्त्यात शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न. त्या तरुणीचा मृत्यू
 •  12 फेब्रु 2020-सोलापूर मध्ये 16 वर्षीय दलित मुलीवर 10 नराधम सहा महिने लैंगिक  अत्याचार आणि बलात्कार करत होते.
 •  फेब्रुवारी 2020 मध्ये महिला/युवतींना जाळून मारण्याच्या किमान 7 घटना घडल्या होत्या. हिंगणघाट, सिल्लोड, पनवेल, मिरारोड, लातूर, नागपूर, लासलगावांत या घटना घडल्या होत्या.
 •  30 जून रोजी येथे मंठा, जालना येथे लग्नाच्या तिसर्‍या दिवशी भर रस्त्यात 21 वार करून हत्या, 
 • 24 जुलै रोजी मौजे करंजविहिरे (ता. खेड, पुणे) येथे १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचारकरून दगडाने ठेचून हत्या,
 • 25 जुलै रोजी नांदुरा (जि. बुलडाणा) येथे 3 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार,
 • 26 जुलै रोजी तांबडी (ता. रोहा) येथे 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या,
 • 28 जुलै रोजी मुंबईत चालत्या गाडीत 15 वर्षीय मुलीवर अत्याचार,
 • 3 ऑगस्ट रोजी पाबळ (ता. शिरूर, पुणे) येथे 11 वर्षांच्या मुलीवर अत्याचार,
 •  4 ऑगस्ट : कराड येथे 10 वर्षांच्या चिमुकलीवर 54 वर्षांच्या नराधमाकडून बलात्कार,
 •  4 ऑगस्ट : औरंगाबाद येथे 19 वर्षीय मुलीवर बलात्कार,
 •  7 ऑगस्ट : चंद्रपूर येथे 16 वर्षीय मुलीवर बलात्कार, तिची आत्महत्या,
 •  12 ऑगस्ट : रत्नागिरी खेड येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार
 •  13 ऑगस्ट : जळगाव येथे दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार,
 •  ऑगस्ट : दिशा सालियान बलात्कार आणि हत्या
 •  14 सप्टें : धारावीत 5 वर्षीय मुलीवर 59 वर्षांच्या नराधमाकडून बलात्कार,
 •  25 सप्टें : बेपत्ता असलेल्या 21 वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्या निवासस्थानाजवळच्या गटारामध्ये घाटकोपर इथे सापडला.
 •  29 सप्टें :अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या तत्कालिन निरिक्षकआणि सध्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला वादग्रस्त पोलीस अधिकारी विकास वाघ याच्याविरोधात तरुणीचा छळ करून तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी कोतवाली पो. ठाण्यात गुन्हा दाखल
 • कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर प्रिया गायकवाड या महिलेला तिच्या आईनं पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल केलं होतं. मात्र, जम्बो हॉस्पिटलमधून महिलेला 5 सप्टेंबरला डिस्चार्ज मिळाला होता. मात्र, तेव्हापासून ही महिला बेपत्ता होती.अखेर ही 33 वर्षीय महिला 26 सप्टें ला पिरंगुटच्या घाटात सापडली.
 •  1 ऑक्टो : नागपूर: गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर व्हिडिओ
  काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत 33 वर्षीय घटस्फोटित महिलेचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अत्याचार करणाऱ्या पोलिसाला अटक केली आहे
 • 3 ऑक्टो : मुंबईत एका सहा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा दुर्दैवी प्रकार उघडकीस. .

 • 6 नोव्हें : नागपूर : मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन सहकारी बँकेतील
  एजंटने 31 वर्षीय महिलेवर अत्याचार केला. ही घटना नंदनवन भागात उघडकीस आली.
 • नोव्हे २०२० : जळगाव जिल्ह्यात पारोळा येथे दलित समाजातील मुलीवर सामूहिक अत्याचार करुन तिचा खून
 • 12 डिसें : कोल्हापूर : एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील साखरवाडी इथली ही घटना आहे. अत्याचार करणाऱ्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. ही विवाहित महिला दीड वर्षांच्या मुलीला घेऊन शेजारील घरात गप्पा मारण्यासाठी गेली असता तिच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला.
 • 15 डिसें : पिंपरी-चिंचवड शहरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून
  तिच्यासोबत असणाऱ्या मावस बहिणीचा विनयभंग करत अपहरण केल्याची घटना
 • 21 डिसें : पुणे: सहकारी जीम ट्रेनर तरुणीला शीतपेयातून गुंगीचे औषध
  देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना खराडी परिसरात घडली. तसेच या घटनेचे चित्रीकरण करून आरोपीने तरुणीला धमकावले. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 • 22 डिसें : मुंबई उपनगरातील वसईत बलात्काराची संतापजनक घटना घडली आहे.
  एका चार वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून 34 वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. क्रौर्याचा कळस म्हणजे अत्याचारानंतर मुलगी मृत पावल्याचं समजून या नराधमाने तिला प्लॉस्टिकच्या पिशवीत टाकून रस्त्यावरच टाकून दिलं.
 • 25 डिसें : नवी मुंबई – वाशी खाडीपुलावर रेल्वेरुळालगत गंभीर जखमी अवस्थेत
  एक तरुणी सापडली असून तिच्यावर लैंगिक अत्याचाराची शक्यता. बलात्कार करुन फोडलं डोकं, चालत्या ट्रेनमधून रेल्वे रुळावर फेकलं अशी ही संतापजनक घटना
 • 26 डिसें : रायगड जिल्ह्यात निवडणुकीच्या वादातून महिला विवस्त्र करून मारहाण
  करण्यात आली. रोहा तालुक्यातील खाजणी गावात ही धक्कादायक घटना घडली. दिराला मदत केल्यामुळे ही मारहाण झाली.
  गावाने बहिष्कृत केलेल्या एका विधवा महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रोहा पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली.
 • 28 डिसें : पिंपरी – डेटिंग अॅपवर ओळख झाल्यानंतर मित्राने एअर होस्टेस तरुणीला
  हॉटेलवर नेऊन जबरदस्ती दारू पाजली. तिला घरी आणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पीडितेने केलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात पुण्यातील वाकड पोलिसांत गुन्हा दाखल
 • 28 डिसें : सामूहिक बलात्कार पीडित महिलेला ठरवले चारित्र्यहिन, बीड जिल्ह्यातील प्रकार बीड़ जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील वसंत तांडा गावात घडली. या महिलेस गावबंदी करण्याचा ठराव
 • जाने 2021 : सांगली : मिरज शहरातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार
 •  30 जाने २१ : संग्रामपूर इथे ४५ वर्षीय महिलेवर शेतात अत्याचार
 •  फेब्रु 2021 : विरार- नालासोपारात राहणा-या 26 वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले .तिचे मुंडन केले, तिचे विवस्त्रावस्थेत चित्रीकरण करून चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल केली
 •  ७ फेब्रु : पूजा चव्हाण हिने ७ फेब्रुवारीला पुण्याच्या वानवडी भागातल्या इमारतीतून उडी टाकून तिनं जीवन संपवलं. या संशयास्पद आत्महत्येनंतर संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
 •  2 मार्च : जळगाव येथील एका वसतिगृहात काही तरुणींना विवस्त्र होऊन नृत्य करण्याची सक्ती करण्यात येत असल्याचा व्हिडीओ व्हायरल
 •  मार्च : नागपूर हरिसाल व्याघ्र प्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी २५ मार्चला सायंकाळी 7 वाजता हरिसाल येथील सरकारी बंगल्यात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. हरिसाल येथे व्याघ्र प्रकल्पाच्या शासकीय घरात दिपाली चव्हाणचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहिली होती. त्यामध्ये वन अधिकारी शिवकुमार यांच्यावर आरोप केले होते. चौकशी समितीचा फार्स फक्त झालाय, न्याय नाही.
 •  मार्च : पुण्यात 14वर्षीय मुलीवर तिघांकडून सामूहिक बलात्कार;विरोध केल्यानंतर नराधमांकडून गोळीबार  एप्रिल : रायगडमधील खालापूर तालुक्यात एका विटभट्टी कामगार असलेल्या आदिवासी कातकरी महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या झाल्याची संतापजनक घटना घडली
 •  एप्रिल : उस्मानाबाद शहरातील हनुमान चौक येथील एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसाने बंदुकीचा धाक दाखवत बलात्कार केला असल्याचं या महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
 •  मे : नाशिकः घरात जबदरस्तीने घुसून पतीस व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत एकाने महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्या प्रकरणी तब्ब वर्षभरानंतर गुन्हा दाखल
 •  जून : वाशिममध्ये महिला पोलीस शिपायावर बलात्कार केल्याप्रकरणी नांदेडच्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरमध्येही दोन घटनेत पोलिसांनी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचं दिसून आलं आहे. मुंबईतही पोलीस अधिकाऱ्याने महिला पोलिसावर बलात्कार केल्याचा गुन्हा डोंगरी पोलीस ठाण्यात नोंद आहे. मुंबईतील एका अभियंत्याने 47 वर्षीय महिला पोलिसावर बलात्कार केला. त्यामुळे या महिला पोलिसाने पुण्यात आत्महत्या केली. सोलापुरातही महिला पोलिसाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे,
 •  २९ जुलै : दक्षिण नागपूरची रहिवासी असलेल्या एका 17 वर्षीय तरुणीवर अनेकांचे अत्याचार
 •  ऑगस्ट : नागपूरमध्ये गतिमंद मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा बलात्कार, चौघांना अटक, दोन फरा
 •  ऑगस्ट : बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना
 •  २३ ऑगस्ट : 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार झाल्याची घटना ऐन रक्षाबंधनच्या दिवशी घडली.
 •  २५ ऑगस्ट : आयटी हब असणाऱ्या हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना
 •  ५ सप्टें : पुणे रेल्वे स्थानक परिसरातून 13 वर्षीय मुलीचं अपहरण करुन रेल्वेतील दोन कर्मचारी आणि काही रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार. दोन दिवस हा सर्व प्रकार सुरु होता.
 •  ९ सप्टें : पुणे रेल्वे स्टेशनपासून आईच्या शेजारी झोपलेली असताना रात्री साधारण 1 च्या सुमारास एका 6 वर्षांच्या मुलीला उचलून रिक्षात घालून मार्केटयार्ड परिसरामध्ये नेलं. तिथं नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
 •  ९ सप्टें : साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात नराधमाने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचे संतापजनक आणि अमानुष कृत्य केले.
 •  १० सप्टें : 15 वर्षीय पीडित मुलीला उल्हासनगर रेल्वे स्टेशननजीकच्या पडक्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार. पीडितेला रात्रभर डांबून ठेवत नरक यातना
 •  १० सप्टें : अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका
  17 वर्षीय मुलीवर गावातीलच एका युवकाने बलात्कार केला होता. यामध्ये युवतीला गर्भधारणा झाली. सात महिन्यांची गर्भवती असताना युवतीने गळफास घेवून आत्महत्या केली.
 •  ११ सप्टें : पिंपरी-चिंचवड मध्ये एका अल्पवयीन मुलीवर सराईत गुंड आणि त्याच्या साथीदारांनी वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना
 •  १२ सप्टें : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शहा शिवारात एका नराधमाने पीडित महिलेची दुचाकी अडवून कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला आहे. बलात्कार करतानाचे अश्लील फोटोही काढले.
 •  १२ सप्टें : अमरावती जिल्ह्यातील रहीमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वनोजा गावात राहणाऱ्या सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच वीस वर्षीय तरुणाचा बलात्कार
 •  १२ सप्टें : परभणीच्या सोनपेठ तालुक्यात एका 16 वर्षीय मुलीवर तीन नराधमांनी मिळून बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अत्याचारानंतर पीडितेने विष प्राशन करुन स्वत:ला संपविले
 •  १५ सप्टें : बुलढाणा जिल्ह्यातील अमडापूर येथे गतिमंद तरुणीवर बलात्कार
 •  २७ सप्टें : नाशिक इथे पॅरोलवर सुटलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीने सिडको परिसरातील एका ब्यूटी पार्लरमध्ये बळजबरीने प्रवेश करीत तेथील एका महिलेला चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला
 •  २४ सप्टें : 15 वर्षाच्या मुलीवर आत्याचार झाल्यानंतर मुल जन्माला आले आणिजन्माला आलेले मुल हे मुंबईतील एकाला दिल्याची खळबळजनक घटना. महाबळेश्वर पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या नेत्याच्या दोन मुलांसह 13 जणांवर गुन्हा दाखल
 •  २४ सप्टें : औरंगाबाद येथील एका खाजगी दवाखान्यात प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टर तरुणीवर अनेकवेळा अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने मुंबईत नोकरी देण्याचं आणि लग्नाचं आमिष दाखवून अनेकदा पीडितेवर अत्याचार केला आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर आरोपीनं पीडित मुलीचे अश्लील व्हिडीओ शूट करून दहा लाखांची मागणी केली आहे.
 •  २७ सप्टें : लातूरच्या औसा तालुक्यातील तुंगी गावात आरोपीने सलग तीन महिन्यांपासून १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार व त्यातून गर्भधारणा
 •  २८ सप्टें : नागपुरात एका २५ वर्षीय बलात्कार पीडितेनं युट्यूब व्हिडिओ पाहून घरीच बलात्कारातून झालेला गर्भ पाडून टाकण्याचा प्रयत्न केला. सिन्नरमध्ये ९ वर्षीय मुलीवर सामुहीक बलात्कार. जळगाव येथे डॉक्टर तरूणीचे हातपाय बांधून परीचारकाने केला बलात्कार, तर औसा येथे ११ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

Law and order in Maharashtra – three thirteen and the culmination of women’s atrocities

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण