क्रांती रेडकर झाली ट्रोल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सध्या समीर वानखेडे हे नाव मीडियामध्ये चर्चेत आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे या दोघांमधील आरोप प्रत्यारोप नेहमीच चर्चेत असतात. सोबतच चर्चेत असते ती समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर. सध्या क्रांती रेडकर तिच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आली आहे.

Kranti Redkar got trolled

तिने ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट शेअर केले आहे. या ट्वीटमध्ये क्रांतीने एक बातमी शेअर केली आहे. या बातमीत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराष्ट्र इंटरनॅशनल टर्मिनल येथे एसीबीने 4 कोटी किंमत असलेले हेरॉइन जप्त केले आहे. ही बातमी शेअर करत ‘शाबास शेरा’ असे कॅप्शन क्रांतीने दिले आहे.


क्रांती मला खरच आश्चर्य वाटत की.. ; अभिनेता आरोह वेलणकरने क्रांती रेडकरच्या समनार्थ केलं ट्विट


हे सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी मात्र तिला चांगलेच ट्रोल केले आहे. काय शाब्बास शेरा? हा त्याच्या नोकरीचा भाग आहे. खुर्च्या उबवायला सरकार पगार देत नाही. समजलं का? अशा शब्दांमध्ये नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केलेली आहे.

Kranti Redkar got trolled

 

महत्त्वाच्या बातम्या