कोयना धरणात ७२.८८ टीएमसी पाणीसाठा ; उद्या वक्र दरवाजे उघडणार

विशेष प्रतिनिधी

सातारा : कोयना धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात आज अखेर ७२.८८ टीएमसी पाणीसाठा :झाला आहे. शुक्रवारी ( ता. २३ )जुलै रोजी धरणातून नदीपात्रात १०००० क्युसेक्स वेगाने पाण्याचा होणार विसर्ग केला जाणार आहे.Koyna Dam 72.88 TMC water storage

आज २२ जुलै रोजी संध्या. ५ वाजता धरणातील पाणी पातळी २१३३ फूट २ इंच झाली असून धरणामध्ये ७२.८८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
धरणाची सांडवा पातळी २१३३ फूट ६ इंच असून या पातळीस पाणीसाठा ७३.१८ टीएमसी आहे.पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे कोयना धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे.तर उद्या २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता कोयना धरणातून नदीपात्रात एकूण १०००० क्युसेक्स विसर्ग सुरू करणेत येणार आहे.

पाणलोट क्षेत्रामधून पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे.

  • कोयना धरणात ७२.८८ टीएमसी पाणीसाठा
  •  कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस
  • उद्या शुक्रवारी दहा हजार क्युसेक्सने विसर्ग होणार
  • नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
  •  पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये वाढ

Koyna Dam 72.88 TMC water storage