पत्नी झोपली चाकू घेऊन बेडरुममध्ये : पतीची पोलिसांत धाव


पत्नी बेडरुममध्ये चाकू घेऊन झोपल्याने घाबरलेलंया पतीने थेट पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. यानंतर पोलिसांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलावून जबाब नोंदवला.


विशेष प्रतिनिधी

पुणे- पत्नी बेडरुममध्ये चाकू घेऊन झोपल्याने घाबरलेलंया पतीने थेट पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. यानंतर पोलिसांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलावून जबाब नोंदवला. याचा राग आल्याने पत्नीने माहेरच्या लोकांच्या मदतीने पतीला बेदम मारहाण केली. यानंतर पतीच्या घरातील दोन लॅपटॉप, सोने आणि घड्याळ असा 1 लाख 59 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.Kothrud area in one family wife sleeping with knife..husband complaint her wife into police station

याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात पत्नी, मेव्हणी,मेव्हणा, सासू-सासरे, निखील शर्मा आणि अशोक मरकडे (सर्व रा. औरंगाबाद) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी पती जितेंद्र भागवत (32,रा. कोंढवा) याचे पत्नीबरोबर विवाहानंतर नेहमी घरगुती वाद होत होते. या वादातून अनेकदा त्याचे सासरच्या लोकांशीही भांडणे झाली होती. त्याच्या सासरचे लोक नेहमी संसारात हस्तक्षेप करत होते.तसेच फिर्यादीच्या आईस तुच्छ वागणूक देत होते. दरम्यान त्यांची पत्नी 8/7/2022 रोजी बेडरुममध्ये चाकू घेऊन झोपली होती. यावेळी फिर्यादीने पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधला होता. दोघांनाही पोलीस स्टेशनला बोलावल्यावर फिर्यादीच्या पत्नीने फिर्यादीविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.

यानंतर सर्व आरोपीने फिर्यादीच्या घरी जाऊन त्यांच्या आईस शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीस लाथा-बुक्‍क्‍वयांनी मारहाण केली. यानंतर घरातील 1 लाख 59 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस साळवे तपास करत आहे.

Kothrud area in one family wife sleeping with knife..husband complaint her wife into police station

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था